उपसभापतीपुत्राच्या प्रमाणपत्राविषयी तक्रारीसंदर्भात मुख्य सचिवांची सूचना

0
144

काही दिवसांपूर्वी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने अव्वल कारकूनपदासाठी घेतलेल्या परिक्षेच्या वेळी सदर पदासाठी अर्ज करताना बनावट पदवी प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप असलेले उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचा मुलगा रेमंड फिलीप फर्नांडिस यांच्या विरुद्धच्या तक्रारीसंबंधी उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी आपले म्हणणे मांडावे अशी सूचना राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांनी त्यांना केली आहे.

ऍड. आयरीश रॉड्रिग्ज यांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारीनंतर उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी गोवा विद्यापीठाच्या निबंधकांना एक पत्र लिहून रेमंड फर्नांडिसचे पदवी प्रमाणपत्र बनावट आहे की खरे याची शहानिशा करण्याची त्यांना सूचना केली होती. तसेच अव्वल कारकून पदांसाठीची निवड प्रक्रिया स्थगित ठेवली होती.

त्याला उत्तर देताना गोवा विद्यापीठाच्या निबंधकांनी लखनौ येथील भारतीय शिक्षा परिषद या संस्थेचे रेमंड फर्नांडिस याने सदर केलेले पदवी प्रमाणपत्र बनावट  असल्याचे उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांना कळवले होते.