उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून गोवा दौऱ्यावर

0
12

उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे मंगळवार दि. 20 ते गुरुवार दि. 22 मे या तीन दिवसांसाठी गोवा दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात 21 मे रोजी उपराष्ट्रपती मुर्मूगांव बंदराला भेट देणार असून, तिथे ते बंदराशी संबंधित नवीन प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करतील. याशिवाय मुरगाव बंदर प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. मुरगाव बंदरात असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही धनखड संवाद साधतील. 22 मे रोजी उपराष्ट्रपती भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयसीएआर) केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेला (सीसीएआरआय) भेट देणार असून, तिथे ते प्राध्यापक व शास्त्रज्ञांसोबत चर्चा करतील. आपल्या गौवा दौऱ्यात उपराष्ट्रपती राजभवनालाही भेट देणार आहेत. राजभवन परिसरात ते चरक आणि सुश्रुत यांच्या पुतळ्यांचे अनावरण करतील. चरकांच्या आयुर्वेदातील आणि सुश्रुतांच्या शस्त्रक्रिया विद्येतील योगदानाच्या सन्मानार्थ हे पुतळे उभारण्यात आले आहेत.