अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 9 सप्टेंबर रोजी यासाठी मतदान होणार असून अर्ज दाखल करण्याच्या 21 ऑगस्टच्या दिवसापर्यंत 68 उमेदवारांनी नामांकने पाठवली आहेत. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकसशाही आघाडीतर्फे सी. पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांनी अर्ज दाखल केला आहे. या दोघांसोबत एकूण 68 अर्ज दाखल करण्यात आले. मात्र, या अर्जाच्या छाननीदरम्यान खासदारांची बनावट स्वाक्षरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. 21 ऑगस्टपर्यंत 48 उमेदवारांनी 68 अर्ज दाखल केले. 19 उमेदवारांचे 28 अर्ज नाकारले तर उर्वरीत 40 अर्जांची छाननी 22 रोजी करण्यात आली.
दरम्यान, या छाननीच्यावेळी खासदारांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा प्रकार उघडकीस आला. केरळच्या जोमोन जोसेफ यांच्या नामांकनाबाबत बनावट स्वाक्षरीचा प्रकार समोर आला. अर्जावर खासदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या वापरण्यात उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जांपैकी फक्त दोन अर्ज वैध आहेत. हे अर्ज सी. पी. राधाकृष्णन आणि बी. सुदर्शन रेड्डी यांचे आहेत. परंतु जोसेफ यांच्या अर्जाच्या छाननीदरम्यान, बनावट स्वाक्षरीचा प्रकार उघडकीस आला. जोसेफ यांच्या अर्जाला 22 प्रस्तावक आणि 22 समर्थकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची नावे आणि स्वाक्षऱ्यांचा समावेश आहे. मात्र, हा अर्ज नाकारण्यात आला आहे.
या अर्जावर सह्या केलेल्या खासदारांनी आपण या अर्जावर सह्या केल्या नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, यातील बहुतांश अर्ज नाकारले असल्यामुळे ही निवडणूक दोनच उमेदवारांमध्ये होण्याची शक्यता बळावली आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट होती, तर आज सोमवार दि. 25 ऑगस्टपर्यंत नावे मागे घेता येतील.उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान 9 सप्टेंबर रोजी होणार आहे आणि त्याच दिवशी देशाला नवीन उपराष्ट्रपती मिळतील.

