27 C
Panjim
Saturday, September 19, 2020

उपयुक्त पालेभाज्या

 • डॉ. मनाली म. पवार
  (सांतइनेज, पणजी)

पालेभाज्यांबद्दल गैरसमज करून घेऊ नये. पालेभाज्या नेहमी पाण्याने स्वच्छ धुवाव्यात. पावसाळ्याच्या दिवसात तर पालेभाज्या मिठाच्या पाण्याने धुवाव्यात म्हणजे त्यांना चिकटलेले जंतू अथवा कृमिबीजे पोटात जाऊन रोग होणार नाहीत. योग्य प्रकारे पालेभाज्यांचे सेवन केले नाही तर रोग होतात.

पालेभाज्यांमध्ये निरनिराळे क्षार, जीवनसत्वे नि चोथा (फायबर) असतात. ज्या व्यक्तींना मलावष्टंभ (कॉन्स्टिपेशन) आहे त्यांनी दररोज पालेभाज्यांचे अवश्य सेवन करावे. त्यामुळे मलवृद्धी होऊन व त्यामध्ये सारक गुणही असल्याने मलप्रवृत्ती साफ होते.
‘‘हितभुक् मितभुक् अशाकभुक् कोऽरुक् |’’
हितकर, योग्य मात्रेत व शाकरहित भोजन घेतल्यास मनुष्य आजारी पडत नाही, असे आयुर्वेद शास्त्रात वर्णन आहे. पण याचा नेमका अर्थ लक्षात घ्यावा. पालेभाज्यांबद्दल गैरसमज करून घेऊ नये. पालेभाज्या नेहमी पाण्याने स्वच्छ धुवाव्यात. पावसाळ्याच्या दिवसात तर पालेभाज्या मिठाच्या पाण्याने धुवाव्यात म्हणजे त्यांना चिकटलेले जंतू अथवा कृमिबीजे पोटात जाऊन रोग होणार नाहीत. योग्य प्रकारे पालेभाज्यांचे सेवन केले नाही तर रोग होतात. म्हणून पालेभाज्या योग्य प्रकारे स्वच्छ करूनच सेवन कराव्यात. अन्यथा सेवन करू नयेत.
आयुर्वेदामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पालेभाज्यांचे गुण, त्यांचे रोगघ्नत्व, आहारातील त्यांचा उपयोग वर्णन केले आहे.

 • भाज्या फार बारीक चिरू नयेत.
 • भाज्या शिजवताना आहार-घटकांचा कमीत कमी नाश व्हावा म्हणून कमी वेळात व कमी उष्णतेत त्या शिजवाव्यात.
 • भाजीतील पाणी फेकून देऊ नये.
 • एकदा शिजलेली भाजी वारंवार गरम करू नये.
 • हिरव्या पालेभाज्यांपासून लोह, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड व जीवनसत्त्व-‘क’ मिळते.
 • व्याधिक्षमत्व वाढविण्यासही या मदत करतात.
 • शाकभाज्या रक्ताची क्षारियता टिकवून ठेवतात.

पानओवा – पानओवा म्हणून एक छोटे झुडूप असते. याची पाने गोलाकार, मांसल अशी असतात. या पानांना ओव्याचा वास येतो, म्हणून या झुडपाला पानओवा असे म्हणतात. काही प्रांतामध्ये याची भाजी केली जाते. या पानांची भजीसुद्धा छान चविष्ट लागतात.
छोटी फांदी जरी पावसाळ्यात जमिनीत लावली तरी त्यापासून बघता बघता नवीन झाड तयार होते. याचे औषधी उपयोग पाहता, पानओव्याचे झाड कुंडीत, प्रत्येकाच्या परसबागेत असणे गरजेचे आहे.

 • गुदभागी खाज येणे, त्या ठिकाणी कायम ओलसरपणा जाणवणे, भूक कधी लागणे- कधी न लागणे- म्हणजेच पोटात जंत असल्यास. पानओव्याच्या पानांचा रस घेण्याने फायदा होतो. तसेच दोन चमचे पानांच्या रसात चिमूटभर हळद, दोन चमचे धन्याची पूड, चवीनुसार घेणे चांगले.
 • जेवणानंतर पोटात जडपणा जाणवणे, डोळ्यांवर झापड येणे, ढेकर येत राहणे, छातीत अस्वस्थ वाटत राहणे… वगैरे तक्रारींवर जेवणानंतर पानओव्याची दोन पाने चावून खाण्याने बरे वाटते.
 • भूक लागत नसली, तोंडाला चव नसली तर जेवणाच्या सुरुवातीला पानओवा, आले, लिंबू, काळी मिरी व सैंधव एकत्र करून बनविलेली चटणी अर्धा चमचा प्रमाणात व जेवताना अधूनमधून तोंडी लावण्यासाठी खाण्याने लगेच गुण येतो.
 • जिभेवर पांढरा थर साठणे, अन्नाची चव व्यवस्थित न लागणे, तोंडात चिकटपणा जाणवणे वगैरे तक्रारींवर पानओव्याचे पान चावावे व सुटलेली लाळ थुंकून टाकावी.
 • सूप बनविताना ओव्याची एक-दोन पाने ठेचून टाकण्याने ते अधिक रुचकर बनते. तोंडाची चव वाढविण्यास मदत होते. पचायला हलके बनते.
  वारंवार सर्दी-खोकला होणार्‍यांनी अधून मधून ओव्याच्या पानांचा आहारात समावेश करावा.

करडई –
करडईचे झाड साधारण कंबरेइतके उंच वाढते. याची पाने लांबट असून कडेला कातरलेली असतात. करडईची फुले पिवळ्या रंगाची असतात. या फुलापासून रंग तयार करतात. करडईच्या बियांचे तेल काढतात. करडईच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.
कुसुम्यपत्रं मधुरमनेत्र्यमुष्णं कटु स्मतम् |
अग्निदीप्तिकरं चातिरुच्यं रुक्ष गुरू स्मृतम् |
सरं पित्तकरं चाम्ल गुदरोगकरं मतम् ॥
करडईची भाजी चवीला आंबटगोड पण विपाकाने तिखट असते. म्हणून उष्ण स्वभावाची असते. डोळ्यांसाठी अहितकर असते. अग्नी प्रदीप्त करते. रुचकर असते. रूक्ष गुणांची असते. पचायला जड असते. पित्त वाढवते. सारक असते. अति प्रमाणात सेवन केल्यास गुदरोग होतात.
करडई उष्ण, पित्त वाढविणारी असते. तसेच विदाही, शरीरात गेल्यावर दाह उत्पन्न करणारी असते. त्यामुळे उन्हाळ्यात, शरद ऋतूत व पित्ताचा त्रास असणार्‍यांनी करडईची भाजी न खाणेच चांगले.

 • सध्या स्वयंपाकात करडईचं तेल वापरण्याची प्रथा आहे. पण करडईचे तेल डोळ्यांसाठी अपायकारक सांगितले आहे. करडईचे तेल सर्व तेलात निकृष्ट तसेच त्रिदोषकर असते.
 • करडईची भाजी पचायला जड व विदाही असल्याने ती खाल्ल्यावर ज्यांच्या पोटात आग होते, त्यांनी निश्‍चित टाळावी. तसेच ही भाजी रात्री खाऊ नये.
 • शरीरावरची चरबी कमी करण्यासाठी करडईच्या पानांचा रस शरीरावर चोळून नंतर स्नान करण्याने फायदा होतो.
 • वारंवार जंत होणार्‍या व्यक्तीसाठी करडईची भाजी पथ्यकर असते. यामुळे गुदभागी ओेलसरपणा जाणवतो. या तक्रारी कमी होतात.

अंबाडी –
स्याद् अम्लवाटी कटुकाम्लतिक्ता
तीक्ष्ण तथोष्ठा मुखपाककर्ती |
विदाहपित्तास्रविकोपनी |
चविष्टम्भदा वातनिबर्हणी च ॥
अंबाडीची भाजी चवीला आंबट, तिखट व कडवट असते. बद्धकोष्ठता निर्माण करू शकते.

 • अंबाडीची भाजी नियमितपणे खाल्ल्यास तोंड येऊ शकते. रक्तपित्ताचा त्रास होऊ शकतो.
 • त्यामुळे शरद ऋतूत, ग्रीष्म ऋतूत अंबाडीची भाजी खाणे टाळावे,
 • अंबाडीची जुनी झालेली भाजी अजिबात खाऊ नये. त्यामुळे पोटदुखी, शौचाला खडा होणे वगैरे त्रास होऊ शकतो.
 • मुका मार लागला असता अंबाडीची पाने वाटून तयार केलेला लेप गरम करून लावून ठेवण्याने वेदना कमी होतात.
 • यकृताची कार्यक्षमता कमी झालेली असल्यास, विशेषतः फॅटी लिव्हरचे निदान झालेले असल्यास अंबाडीची भाजी अधूनमधून आहारात समाविष्ट करणे चांगले.

STAY CONNECTED

846FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

बेलगाम कोरोना….

डॉ. राजेंद्र साखरदांडे लोक एवढे घाबरलेत, बिथरलेत की वेडे व्हायचे राहिलेत. माझ्या मते वर्षभरात हायपरटेन्शन, मधुमेह, हृदयविकार, वेडेपणा,...

मला भावलेले अनिल बाब

कामिनी कुंडईकर विधिलिखित चुकत नाही हेच खरे. ५ सप्टेंबर रोजी बातमी येऊन धडकली की ‘अनिलबाब गेले’. विश्वासच बसेना....

‘अधिकस्य अधिकं फलम्’

नारायण बर्वे, वाळपई यावर्षी अधिकमास १८ सप्टेंबर २० ते १६ ऑक्टोबर २० पर्यंतच्या कालावधीमध्ये येत आहे. आपणही अधिकमासाची,...

असंतोषाचे ‘बादल’

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिनीच त्यांच्या मंत्रिमंडळातील विश्‍वासू मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाच्या एकुलत्या एक मंत्री हरसिम्रतकौर बादल यांनी सरकारच्या ‘शेतकरीविरोधी...

ALSO IN THIS SECTION

असंतोषाचे ‘बादल’

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिनीच त्यांच्या मंत्रिमंडळातील विश्‍वासू मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाच्या एकुलत्या एक मंत्री हरसिम्रतकौर बादल यांनी सरकारच्या ‘शेतकरीविरोधी...

खासगी इस्पितळांच्या कोरोना शुल्काचा फेरआढावा घेणार

>> मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती राज्यातील खासगी इस्पितळांना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या शुल्काचा फेरआढावा घेतला जाणार आहे,...

पुढील चार दिवस पावसाची शक्यता

पश्‍चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यातील काही भागात आगामी चार दिवस जोरदार पावसाचा इशारा काल हवामान खात्याने दिला आहे.

पुन्हा ८ जणांचा मृत्यू, ५९६ बाधित

>> मृतांमध्ये दोन युवक, एक युवती राज्यात गेल्या चोवीस कोरोना पॉझिटिव्ह आणखी ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून नवे ५९६...

कृषी विधेयकावरून विरोधकांकडून शेतकर्‍यांची दिशाभूल ः पंतप्रधान

कृषी विधेयकावर बोलताना काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांना आपली दिशाभूल होऊ देऊ नका असे आवाहन केले. यावेळी त्यांनी या विधेयकावरून विरोधक...