सरकारने जारी केलेल्या एका आदेशाद्वारे राज्यातील उपनिबंधकांच्या बदल्या करून विविध ठिकाणी नियुक्त्या केल्या आहेत. सहा जणांना बढत्या देण्यात आल्या आहेत. उपनिबंधकांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे – चंद्रकांत पिसुर्लेकर (म्हापसा), निर्मला आर हंचिमनी (पेडणे), नंदिनी डी. अलोमेकर (पणजी), रामदास पेडणेकर (डिचोली), अर्जुन एस. शेट्ये (मुख्य कार्यालय पणजी), सुरज वेरेकर (सासष्टी), डॉमनिक टी. फर्नांडिस (फोंडा), फातिमा फर्नांडिस (काणकोण), जे. सी. ब्रागांझा (धारबांदोडा), जगदीश नाईक (सांगे), नयनेश्वर चोपडेकर (सत्तरी) व गुरुदास काकोडकर (केपे).