27.2 C
Panjim
Monday, April 19, 2021

उन्हाळ्यात त्वचेची काळजी

 • डॉ. मनाली म. पवार
  (सांतइनेज-पणजी)

सूर्याच्या प्रखर उष्णतेने शरीराचा ओलावा कमी होतो, घामावाटे, मूत्रावाटे व काही प्रमाणात मलावाटे शरीरातून जलीय अंश जास्त प्रमाणात बाहेर पडू लागतो. त्यामुळे लघवीच्या तक्रारींबरोबर त्वचेच्या तक्रारीही सुरू होतात.
शरीरातील ओलावा टिकवण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यंग.

‘आला उन्हाळा, प्रकृती सांभाळा’. सूर्याची किरणे प्रखर होत आहेत. हवामान गरम होत आहे. नैऋत्य दिशेने गरम वारे वाहात आहेत. हवेतील उष्णता वाढल्याने वातावरण रूक्ष होत आहे व शरीरात वातदोष साठावयास सुरुवात झाली आहे. गरम हवेमुळे जठराग्नीची पचनशक्ती कमी होते व म्हणूनच भूक फारशी लागत नाही. सूर्याच्या प्रखर उष्णतेने शरीराचा ओलावा कमी होतो, घामावाटे, मूत्रावाटे व काही प्रमाणात मलावाटे शरीरातून जलीय अंश जास्त प्रमाणात बाहेर पडू लागतो. त्यामुळे लघवीच्या तक्रारींबरोबर त्वचेच्या तक्रारीही सुरू होतात.
उन्हाळ्यात त्वचेवर आढळणारी लक्षणे …..

 • त्वचा काळवंडते (चेहरा जास्त काळवंडतो)
 • त्वचेवर पुटकुळ्या येतात.
 • सर्वांगाला खाज येते.
 • त्वचेवर लाल-पांढरे चट्टे उठतात.
 • त्वचेचा दाहही होतो.
 • त्वचा रूक्ष होते व रुक्ष त्वचा ताणल्याने दुखायलाही लागते.
 • त्वचा निस्तेज बनते.
  प्रश्‍न जेव्हा त्वचेचा किंवा सुंदरतेचा असतो तेव्हा मात्र रुग्ण लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतात किंवा वेगवेगळ्या क्रीम्स वापरू लागतात कारण ही लक्षणे त्वचेवर दिसणारी असतात. नाहीतर तसेही बारीक-सारीक न दिसणार्‍या लक्षणांकडे रुग्ण डोळेझाक करतात. पण चेहरा, त्वचा, सौंदर्य म्हटले की महागड्या क्रीम आल्याच. पण उन्हाळ्यातील या तक्रारींना आपण साध्या-सुध्या घरगुती उपायांनी, आहार आचरणाने उपशय मिळवू शकतो. केमिकल क्रीमपेक्षा आपण घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांनी त्वचेची काळजी घेऊ शकतो.
  निसर्गाच्या अनुकूल आपण चिकित्सा करावी…
 • शरीरातील ओलावा टिकवण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यंग.
  रोज रात्री झोपताना किंवा आंघोळीच्या अगोदर किंवा आंघोळीनंतर सर्व अंगाला हलक्या हाताने तेल लावावे. त्यासाठी साधे खोबर्‍याचे तेल, बदामाचे तेल, कुंकुमादी तेल, तिळाच्या तेलाचा उपयोग करावा.
 • सन-टॅन घालवण्यासाठी कुठल्याही युव्ही क्रीमपेक्षा कुंकुमादी तेलाचा वापर करावा.
 • क्लिन्सिंग मिल्क म्हणून निरस दूध चेहर्‍याला, हाताला लावले तरी कमी पैशात नैसर्गिकपणे चेहर्‍यावरील, त्वचेवरील घाण निघून जाते.
 • स्क्रब म्हणून सध्या संत्री-मोसंबी-लिंबू ही फळे उन्हाळ्यात भरपूर खाल्ली जातात व खावीत, पण त्यांच्या साली काढून चांगल्या उन्हात सुकवाव्या. चांगली पाच-सात उन्हं दिली की त्या चांगल्या सुकतात. मग त्या सालींची चांगली पूड करून हवाबंद डब्यात भरून ठेवावी. ही पूड थोड्याशा पाण्यात मिसळून त्वचेवर चोळल्यास स्क्रबर म्हणून कार्य करते.
 • लोणी त्वचेला लावावे. तसेच त्वचेची रक्षा करण्यासाठी दुधाची साय किंवा सध्या ताजे क्रीम बाजारात विकत मिळते, जी केकमध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये घालतात, ती क्रीमही संपूर्ण त्वचेला लावू शकतो. नॅचरल फेसपॅक म्हणून सध्या पार्लरमध्ये भरपूर पैसे देऊन आपण फळांचा गर लावून घेतो. ह्याच फळांचा गर- उदा. पपई, सफरचंद, केळे, काढून आपणही वर्तुळाकार आकाराने फिरवून नंतर चेहर्‍यावर लावून वीस मिनिटे ठेवले तर पार्लरसारखेच फ्रूटफेसपॅकसारखेच परिणाम दाखवणार.
 • चेहर्‍यावरील सन-टॅन, सुरकुत्या, निस्तेजता, ब्लॅक हेड्‌स, व्हाईट हेड्‌स, डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं, चेहर्‍यावर, गालावरील हायपर-पिगमेंटेशनचे धब्बे दूर करण्यासाठी आपण हजारो रुपये खर्च करून फेशियल मसाज करून घेतो. पण हेच आपण निरस दूध लावून – क्लिनसिंग, फळांच्या सालांनी स्क्रबिंग, गरम पाण्यात ४-५ थेंब लिंबाचा अर्क, गुलाबाचा अर्क, तुळशीचा अर्क इ. टाकून वाफ घेतल्यास चेहर्‍यावरच्या रंध्रांतील घाण साफ होऊन रंध्रे चांगली उघडली जातात. मग त्यावर लोणी किंवा ताजी मलई (दुधाची साय) मसाज करायचे म्हणजे क्रीम मसाज होतो. शेवटी कुठल्याही फळाचा गर किंवा मिश्र फळांचा गर घेऊन त्याचा पॅक लावावा. झाले संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी चांगले सॅनिटाइझ पद्धतीने पूर्ण ‘फेशियल किट’ तयार.
 • दोन चमचे बेसन, पाव चमचा हळद, दोन चिमूट कापराचे चूर्ण एकत्र करून आंघोळीच्या वेळी साबणाच्या ऐवजी वापरल्यास त्वचा सतेज, मऊ व निरोगी राहते.
 • चांगले दिवसातून तीन ते चार वेळा थंड पाण्याने स्नान करावे. स्नान केल्याने शरीरशुद्धी होते. त्वचेवर कांती येते. प्रसन्न वाटते. थकवा दूर होतो.
 • रसायने असलेल्या साबणाऐवजी गोमय, मृत्तिका, घृतकुमारी, चंदन, हळदीपासून तयार केलेल्या, खोबरेल तेलाचा अंग असलेला साबण वापरावा.
 • किंवा चणाडाळ, मसूर डाळ यांच्या पीठाने उद्वर्तन करून स्नान करावे.
 • चंदन, हळद, करंज, ज्येष्ठमधसारखी द्रव्येही उटणे म्हणून वापरता येतात.
 • वातामुळे काळेपणा आल्यास जायफळ, हळद, ज्येष्ठमध, करंजसारख्या द्रव्यांनी सिद्ध केलेले तेल लावावे. सहस्रार तेल, चंदन बलालाक्षादि तेल, नारायण तेल यांचा वापरही करता येतो. आहारामध्येही हळदीचा वापर जास्त करणे.
 • त्वचा कोरडी होऊन फुटत असल्यास दुधाची साय किंवा लोणी किंचित हळदीसह हलक्या हाताने चोळावे.
 • पाव चमचा लिंबाचा रस व थोड्या पाण्यामध्ये १ चमचा जिर्‍याची पूड व चमचाभर बेसन रात्रभर भिजत घालावे. आंघोळीपूर्वी अंगाला लावावे व कोमट/गार पाण्याने आंघोळ करावी. याने त्वचा सतेज व घट्ट होते.
 • चंदन व बदाम पाण्यात किंवा दुधात सहाणेवर उगाळून तयार केलेल्या गंधात दोन चिमूट हळद घालून तयार केलेले मिश्रण चेहर्‍यावर २० ते २५ मिनिटे लावावे व नंतर कोमट पाण्याने धुवावे. याने त्वचा सतेज व मुलायम होते. आणि चेहर्‍यावरील मुरूम, काळे डाग, फोड कमी होतात.
 • कोरफड ही त्वचेसाठी वरदान आहे. आजकाल घराघरात घमेल्यामध्ये, कुंड्यांमध्ये लावलेली दिसते. तिचा गर चेहर्‍यावर, संपूर्ण अंगाला लावल्याने अंगाचा दाह, रुक्षपणा, निस्तेजता कमी होते.
 • जवाच्या पीठात गुलाबाच्या पाकळ्यांचे चूर्ण, मेथ्यांचे चूर्ण, हळद, जिर्‍याची पूड, धन्याची पूड यांपैकी उपलब्ध चूर्णे टाकावीत व तयार केलेले मिश्रण चेहरा धुण्यासाठी वापरावे. याने धूळ व प्रदूषणामुळे दूषित झालेली त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.
 • त्वचा निरोगी व तेजस्वी असावी अशी इच्छा असणार्‍यांनी दूध, लोणी, तूप, मध, केशर, हळद वगैरे त्वचापोषक व रक्तशुद्धी करणार्‍या गोष्टींचे नियमित सेवन करावे.
 • चंदन, केशर, क्षीरकाकोली, श्‍वेतदुर्वा, ज्येष्ठमध, पद्मकाष्ठ, वाळा, मंजिष्ठा, अनंत

STAY CONNECTED

849FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

कोरोना लसीकरण घ्यावे का?

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज) या एका वर्षात संशोधकांनी कठोर मेहनतीने कोरोनावर लस बनवली; मात्र आज कोरोना लसीकरण जगभरात...

थर्टीन

लेख- १३ बायोस्कोप प्रा. रमेश सप्रे ‘थर्टीन’ शब्दाचेही दोन पैलू आहेत. शुभ नि अशुभ! आपण अशुभ...

अनासक्तीचा आदर्श ः ‘कमळ’

योगसाधना - ५००अंतरंग योग - ८५ डॉ. सीताकांत घाणेकर शास्त्रीजी कमळाबद्दल सारांश करताना म्हणतात- कमळ...

क्षयरोग्यांनाही लसीकरण उपयुक्त

डॉ. प्रदीप महाजन (रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर) या लसींमध्ये सक्रिय व्हायरस नसतो ज्यामुळे एखाद्याला रोगाचा त्रास होईल किंवा आरोग्य...

‘एओर्टिक व्हॉल्व’ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

डॉ. बिपीनचंद्र भामरे(कार्डियो-थोरॅसिक सर्जन) आपल्या हृदयाच्या झडप शस्त्रक्रियेनंतर बरे झाल्यावर बद्धकोष्ठता, जखमेची सूज किंवा लालसरपणा, भूक कमी होणे...