उद्यापासून राज्यात मुसळधार शक्य

0
111

9 ते 11 जून या दरम्यान उत्तर व दक्षिण गोव्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आज (दि. 8 जून) राज्यातील काही मोजक्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
भारतीय हवामान खात्याने 11 जूनपर्यंत राज्याला ऑरेंट अलर्ट दिला आहे. या दिवसांत राज्यातील काही भागांत ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.