उद्यापर्यंत काही भागात जोरदार पावसाची शक्यता

0
28

राज्यात चोवीस तासांत एकूण 3.17 इंच पावसाची नोंद झाली आहे. येथील हवामान विभागाने राज्यातील काही भागात येत्या 29 ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत एकूण 11.46 इंच पावसाची नोंद झाली असून सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण 86.3 टक्के जास्त नोंद झाले आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे. चोवीस तासांत दाबोळी आणि मुरगाव भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. दाबोळी येथे 5.15 इंच आणि मुरगाव येथे 5.12 इंच अशा पावसाची नोंद झाली.
पणजी येथे 4.21 इंच, म्हापसा येेथे 3.31 इंच, जुने गोवे येथे 3.50 इंच, साखळी येथे 2.14 इंच, फोंडा येथे 1.77 इंच, धारबांदोडा येथे 3.25 इंच, काणकोण येथे 3.35 इंच, मडगाव येथे 1.65 इंच, केपे येथे 1.77 इंच आणि सांगे येथे 1.44 इंच पावसाची नोंद झाली आहे.