उदय भेंब्रेंविरोधात फोंडा, फातोर्डा पोलिसांत तक्रार

0
14

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी माजी आमदार, ज्येष्ठ साहित्यिक उदय भेंब्रे यांच्याविरोधात फोंडा आणि फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची गोव्यात राजवट होती. त्यामुळे धर्मांतरे रोखण्यास मदत झाली होती, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य पातळीवरील शिवजयंती सोहळ्यात बोलताना केले होते. त्याला आक्षेप घेताना, गोव्यात शिवाजी महाराज यांची राजवट नव्हती. मुख्यमंत्री डॉ. सावंत चुकीचा इतिहास लोकांसमोर ठेवत आहेत, असे वक्तव्य उदय भेंब्रे यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर केले होते. बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी उदय भेंब्रे यांच्या फातोर्डा-मडगाव येथील निवासस्थानी जाऊन वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी माफी मागण्याची मागणी केली होती.

दरम्यान, उदय भेंब्रे यांनी शिवरायांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजातर्फे मंगळवार दि. 4 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता कुंकळ्ळीतील चिफ्टन मेमोरिअल उद्यानात एका सभेचे आयोजन केले आहे.