देशभरात उन्हाचा पारा चढला असून, उत्तर भारतात उष्णतेचीलाट पसरल्याने 15 ते 17 जून या तीन दिवसांत किमान 98 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 54, तर बिहारमध्ये 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच ताप, धाप लागणे आणि आरोग्याच्या इतर समस्यांमुळे 400 हून अधिक लोकांना या तीन दिवसांत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी पाटण्याचे कमाल तापमान 44.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पाटणा आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये 24 जूनपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.