उत्तर प्रदेशात आज ६ रेल्वे पाठवणार

0
284

गोव्यातून आज शुक्रवारी उत्तर प्रदेशात ६ श्रमिक रेल्वे गाड्या पाठविण्यात येणार आहेत. यामुळे राज्यात अडकून पडलेल्या बर्‍याच मजुरांना दिलासा मिळणार आहे. गुरूवारी ३ श्रमिक रेल्वे गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती माहिती खात्याचे सचिव संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

सरकारी पोर्टलवर परराज्यात जाण्यासाठी सुमारे दीड लाख मजुरांनी नोंदणी केली आहे. आत्तापर्यंत ३७ हजार मजुरांना परत पाठविण्यात आले आहेत. मजुरांना परत पाठविण्यासाठी जिल्हानिहाय रेल्वेंचे नियोजन केले जात आहे. उत्तर प्रदेशात जिल्हानिहाय रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत, असेही कुमार यांनी सांगितले.

करमळी रेल्वे स्थानकावर उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात १६०० मजुरांना घेऊन, तसेच वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये एक, तसेच तिसरी श्रमिक रेल्वे मणिपूर, त्रिपूरासाठी रवाना करण्यात आली आहे. ही रेल्वे मध्यप्रदेशमध्ये थांबा घेणार आहे. त्यामुळे मध्यप्रदेशमधील मजुरांना या रेल्वेतून पाठविण्यात आले आहे, असेही कुमार यांनी सांगितले.

राज्यात मागील चोवीस तासात मास्क न वापरणार्‍या ५४२ जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी ११३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली.