उत्तर-दक्षिण इस्पितळातील नोंदी आता होणार डिजिटल

0
31

आरोग्य व्यवस्थापन माहिती तंत्रज्ञानाचा (एचएमआयएस) वापर करून राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील रुग्ण आणि इस्पितळातील नोंदी डिजिटल करण्यात येणार आहेत.
आरोग्य सेवा संचालनालयाने क्लाऊड बेस्ड हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमचा वापरून राज्यातील रुग्ण आणि रुग्णालयाच्या नोंदी पेपरलेस करण्याची आणि डिजिटल करण्याची योजना आखली आहे.

केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन उपक्रमांतर्गत ही प्रणाली विकसित केली जाणार आहे. रुग्ण आणि रुग्णालयातील नोंदी यांच्यापर्यंत सहज आणि जलद पोहोचण्याचा उद्देश आहे. डिजिटल हेल्थ आयडी म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंटचा वापर करून, या प्रणालीअंतर्गत नागरिकांना अनेक डिजिटल आरोग्य सेवा उपलब्ध होतील. राज्यात ही प्रणाली टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार असून, पहिल्या टप्प्यात उत्तर आणि दक्षिण जिल्हा रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.