वरील मागणी करणारे निवेदन निवडणूक आयोगाला सादर केल्याचे त्यांनी सांगितले. २०१३ मध्ये दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीतही चिन्हाच्या बाबतीत असाच गोंधळ झाला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने पेटत्या टॉर्चचे चिन्ह रद्द करून पेटत नसलेला टॉर्च चिन्ह म्हणून वापरण्यास मान्यता दिली होती. परंतु येथील निवडणूक अधिकार्यांनी त्याचे पालन केले नाही. पेटता टॉर्च व झाडू सारखेच दिसत असल्याने मतदार गोंधळल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले.
कोणतेही चिन्ह नसलेल्या टोप्या घालून मतदान केंद्रावर जाण्यास मज्जाव करणार्या अधिकार्यांविरुध्दही तक्रार केल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले. निवडणूक अधिकार्यांनी वरील प्रकरणी कोणताही आदेश देण्यास नकार दिल्याने आपचे पदाधिकारी नाराज बनले आहेत.

