उत्तर गोवा पर्यटक टॅक्सी संघटना करणार शक्तीप्रदर्शन

0
296

आठपैकी एकच मागणी पूर्ण झाल्याने नाराजी
पर्यटक टॅक्सीवाल्यांच्या दहा मागण्यांपैकी आठ मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले होते. प्रत्यक्षात भाडेवाढ वगळता अन्य कोणतीही मागणी पूर्ण केली नाही, मागण्या धसास लावण्यासाठी विधानसभा अधिवेशनाच्या काळात शक्तीप्रदर्शन करण्याचे ठरविले असून यासंबंधी लवकरच कृषी कार्यक्रम जाहीर करणार असल्याचे उत्तर गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेचे सरचिटणीस विनायक नानोसकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
टॅक्सीवाले पर्यटकांची लुबाडणूक करीत असल्याचे आरोप होत आहेत. वाहतूक खात्याने टॅक्सी दराचे फलक महत्वाच्या ठिकाणी लावावेत. अधिकार्‍यांनी तसे आश्‍वासनही दिले होते. परंतु भाडेवाढ वगळता टॅक्सीवाल्यांची एकही मागणी सरकारने पूर्ण केलेली नाही. संघटनेने केलेल्या दहा मागण्यांपैकी आठ मागण्या पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात मागण्या पुर्ण झाल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले. मागण्या धसास लावण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. टॅक्सीवाले पर्यटकांची लुबाडणूक करीत असल्याचे आरोप होत आहेत. वाहतूक खात्याला टॅक्सी दराचे फलक महत्वाच्या ठिकाणी लावण्याची मागणी त्यांनी केली आहे. अंमलबजावणी झालेली नाही. हॉटेलवाले हंगामात व पावसाळ्यात आपल्या खोल्यांचे वेगवेगळे दर आकारतात, त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्‍न करून मसाज पार्लरच्या बाबतीतही टॅक्सीवाल्यांची बदनामी केली जाते. गोव्यात येणार्‍या पर्यटकांना कुठे काय मिळते याची कल्पना असते.