उड्डाणपुलावरून खालीकोसळून दोघांचा मृत्यू

0
7

बायणा येथील उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री मोठा अपघात घडला. रवींद्र भवननजीक घडलेल्या या अपघातात दुचाकीवरील युवक-युवती थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळल्याने त्या दोघांचा मृत्यू झाला. मात्र अपघातातील दुचाकी संरक्षण कठड्याला धडकून उड्डाणपुलावरच पडल्याचे दिसून आले. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने निघालेला दुचाकीचालक मांगोरहिलहून सड्याच्या दिशेने जात होता. संरक्षण कठड्याला दुचाकी आदळल्यानंतर दोघेही खाली पडत असताना युवतीच्या किंचाळण्याचा आवाज आला. उंचावरून खाली कोसळल्याने युवतीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीचालकाचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. दरम्यान, या ठिकाणी यापूर्वी देखील अपघात घडले आहेत.