Home बातम्या ‘उटा’ नेत्यांवर आरोप निश्‍चितीसाठी आदेश

‘उटा’ नेत्यांवर आरोप निश्‍चितीसाठी आदेश

0
२०११मध्ये ‘उटा’च्या आंदोलनावेळी बाळ्ळी येथे झालेल्या हिंसाचारात दोन युवकांचा होरपळून मृत्यू झाला होता. राज्य सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केले आहे. सीबीआयने एकुण २१ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. पैकी नऊ जणांवर आरोप निश्‍चित करण्याचे आदेश कोर्टाने दिले. तर भाजप नेते व कायदा आयोगाचे अध्यक्ष ऍड. नरेंद्र सावईकर यांच्यासह १२ जणांना आरोपांतून वगळले.

ज्यांच्यावर आरोप निश्‍चित करण्यास सांगितले आहे त्यांत क्रीडा मंत्री रमेश तवडकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप, प्रकाश अर्जुन वेळीप, माजी आमदार वासुदेव गावकर, गोविंद गावडे, विकाश देयकर, मालू वेळीप, सोयरू वेळीप, सविता तवडकर यांचा समावेश आहे. त्यांच्यावर भा.दं.सं.च्या कलम १४३,१४७, १४८, ३४१, ४३५, ४३६, ३२२, १८८, ३२४ यान्वये आरोप आहेत.  
आरोपांतून वगळले आहे त्यांत ऍड. नरेंद्र सावईकर, आनंद वेळीप, रवींद्र गावकर, रुपेश तलवडकर, सुमंत गावकर, विशाल गावकर, राजेंद्र वेळीप, दिवाकर वेळीप, गणेश वेळीप, सुधाकर वेळीप, रोहिदास वेळीप, प्रशांत वेळीप यांचा समावेश आहेत. त्यांना रेल्वे मालमत्तेची हानी करण्याच्या आरोपातून मुक्त केले आहे.
आंदोलनावेळी स्थानिकांनी ‘उटा’नेत्यांच्या इमारतीला आग लावली होती. यावेळी दोन आंदोलनकर्त्या युवकांचा होरपळून मृत्यू झाला होता. हे मृत्यू खून म्हणून पोलिसांनी नोंद केले होते.
याप्रकरणी सर्वप्रथम चौकशी दंडाधिकार्‍यांनी केली होती. मात्र त्याला विरोध झाल्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाने पुन्हा दुसर्‍यांदा चौकशी केली. त्यानंतर न्या. शाह यांच्या आयोगाने चौकशी केली होती. शेवटी हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले होते. ६ जानेवारीपासून खटला प्रारंभ होईल.