राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने गोमंतकीय जनतेसह मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. संदेशात राज्यपालांनी ईद-ए-मिलाद हा पैगंबर महंमद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा पवित्र दिवस असल्याचे म्हटले आहे. प्रेम, बंधुत्व, समानता व मानवतेच्या सेवेचा पैगंबराचा कालातीत संदेश आजच्या काळातही अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. या पवित्र प्रसंगी परस्पर आदर, सामंजस्य व करुणेवर आधारित समाज निर्मितीसाठीच्या आपल्या बांधिलकीचे नूतनीकरण करूया. समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी व प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करूया, असे आवाहन राज्यपालांनी केले. हा सण प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात शांतता, सुख, समृद्धी व उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

