ईडीचा रांचीमध्ये छापा; 25 कोटींची रोकड जप्त

0
10

ईडीने सोमवारी झारखंडची राजधानी रांचीमध्ये 9 ठिकाणी छापे टाकले. या छापेमारीदरम्यान झारखंड सरकारचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांच्या निकटवर्तीयांकडून बेहिशेबी रोकड जप्त केली. ईडीने आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून 25 कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली. नोटांचा ढीग पाहून ईडीचे अधिकारीही चक्रावले. त्यामुळे नोटा मोजण्यासाठी मशीन मागवाव्या लागल्या. या रोकडीशिवाय काही महत्त्वाची कागदपत्रेही हाती लागली असून, हे पैसे ट्रान्सफर पोस्टिंगसाठी घेतल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे.