इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला असताना एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. इस्रायल आणि लेबनॉनने 10 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमती दर्शवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री हे जाहीर केले. लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी झालेल्या अत्यंत सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. शांतता चर्चेसाठी नेतान्याहू आणि औन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करणार असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.