इस्त्रोच्या नव्या उपग्रहाची यशस्वी झेप

0
13

इस्राने काल नव्या उपग्रहाचे उड्डाण काल श्रीहरीकोटा तळावरुन यशस्वी पार पडले. नव्या रॉकेटने त्याचे काम चोख बजावले असून रॉकेटच्या सर्व टप्प्यांनी अपेक्षित कामगिरी केलेली आहे. इस्रोचा नवा प्रक्षेपक एसएसएलव्हीची उंची ३४ मीटर असून व्यास दोन मीटर आहे. काल सकाळी नऊ वाजून १८ मिनिटांनी श्रीहरीकोटा इथून यशस्वीरित्या पहिले उड्डाण झाले. या मोहिमेला इस्रोने एसएसएलव्ही डी१ असे नाव दिले आहे. अवघ्या १०० टन वजनाचा हा नवा प्रक्षेपक फक्त सहा जणांची टीम व अवघ्या सात दिवसांत उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज झाला. यामुळे एसएसएलव्ही प्रक्षेपणाच्या माध्यमातून इस्रोची मनुष्यबळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे. ५०० किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह हे ५०० किलोमीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित करण्याची एसएसएलव्हीची क्षमता आहे.

दरम्यान, काल नव्या एसएसएलव्हीचे वेळेप्रमाणे उड्डाण झाले. नव्या प्रक्षेपकाच्या तीनही टप्प्यांनी अपेक्षित कामगिरी चोख बजावली. प्रक्षेपकाचे तीनही टप्पे पूर्ण झाले, उपग्रहांनी नियोजित उंचीही गाठली आणि उपग्रह ज्या भागावर आरुढ झाले आहेत त्या इंजिनाचा टप्पा सुरु झाला. त्यानंतर दोन्ही उपग्रह प्रक्षेपितही झाले, मात्र हे उपग्रह नियोजित वेळेआधीच प्रक्षेपित झाले असावेत किंवा उपग्रह वेगळे होतांना काही तांत्रिक बिघाड झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.