अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाला 8 एप्रिल रोजी विराम देण्यात आला होता. आता बरोबर दोन महिन्यांनी पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायलने इराणची लष्करी ठिकाणे आणि ऊर्जा केंद्रांवर नव्याने हल्ले केले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली.

