अमेरिकेकडून सज्जता, दोन्ही देशांचे हल्ले-प्रतिहल्ले सुरूच
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असून दोन्ही देश एकमेकांवर नव्याने हल्ले करत आहेत. इराणने नुकतेच जॉर्डन येथील अमेरिकन लष्करी तळावर हल्ला केला.
या हल्ल्यामध्ये अमेरिकेचे दोन सैनिक मारले गेले. यानंतर अमेरिकेने आक्रमक धोरण स्वीकारले असून इराणवर हल्ल्यासाठी तब्बल 50000 सैनिक सज्ज ठेवले आहेत. सलग अकराव्या दिवशी अमेरिका आणि इराणने एकमेकांच्या तळांवर हल्ले केले आहेत.
दरम्यान, 17 जुलै रोजी जॉर्डनमध्ये इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात दोन अमेरिकी सैनिक ठार झाले. आणखी एक सैनिक अद्याप बेपत्ता आहे. सैनिकांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. लष्कराने म्हटले आहे की, त्यांच्या कुटुंबीयांना अधिकृत माहिती दिल्यानंतर 24 तासांनी त्यांची नावे जाहीर केली जातील. ठार झालेल्या अमेरिकी सैनिकांची एकूण संख्या 16, तर 430 हून अधिक सैनिक जखमी झाले आहेत.
ट्रम्प प्रशासनाने पेंटागॉन आणि त्यांच्या संपूर्ण सैन्याला जॉर्डनमधील दोन अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली आहे. यापूर्वी, ट्रम्प यांनी या मृत्यूंबद्दल दुःख व्यक्त केले होते आणि इराणला स्पष्ट इशारा दिला होता की वॉशिंग्टन तेहरानला अण्वस्त्रे मिळवण्याची कधीही परवानगी देणार नाही.
दरम्यान यानंतरही इराणने जॉर्डनमधील एका अमेरिकी तळावर पुन्हा एकदा हल्ला केला. इराणने जॉर्डनमधील मुवफ्फाक साल्टी हवाई तळावर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. ज्यामध्ये क्षेपणास्त्रे थेट अमेरिकी लष्करी तळावर पाडण्यात आली.
युक्रेनचा रशियावर
द्रोन हल्ला
युक्रेन आणि रशियामधील संघर्ष पुन्हा एकदा भडकला आहे. युक्रेनने रशियावर द्रोनने भीषण हल्ले केले असून यात हल्ल्यात 9 जण ठार झाले तर 80 हून अधिकजण जखमी झाले आहेत. युक्रेनने रशियाची सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंग कंपनी वालल्डबेरीजच्या दोन मोठे गोदाम, ऑइल डेपो आणि इतर ठिकाणावर हे हल्ले केले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकी यांनी, रशियाच्या ताब्यातील ताब्यात असलेल्या लष्करी तळांवरही हल्ला केल्याचेही म्हटले आहे.

