इराणवर अमेरिकेचे क्षेपणास्त्र हल्ले सुरूच

0
11

इराणवर अमेरिकेने सलग 12 व्या दिवशी क्षेपणास्त्र हल्ले केले असून इराणनेही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 22 जुलै रोजी इराणच्या नागरी आणि मूलभूत पायाभूत सुविधांना उद्ध्वस्त करण्याचा थेट इशारा दिला होता. त्यानुसार इराणच्या अहवाज, रामशिर आणि एंडिमेस्क या प्रमुख शहरांनजीकच्या भागांवर अमेरिकेने क्षेपणास्त्रांचा मारा केला. इराणनेही अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले.
या हल्ल्यांमुळे होर्मुझमधील वाहतूक ठप्प झाली आहे. यमनमधील इराणी पाठबळ असलेल्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात सौदीच्या जहाजांना लक्ष्य करण्याची धमकी दिल्याने व्यापाराचा दुसरा महत्त्वाचा मार्गही धोकादायक झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल’चे दर 93 डॉलर प्रति बॅरलच्या पार गेले
आहेत.