गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील विद्यालयात शारीरिक शिक्षण (स्पोर्ट्स आणि वेल बीईंग) हा नवीन सातवा विषय इयत्ता नववीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. एनएसक्यूफ योजनेखाली शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे, असे मंडळाने जारी केलेल्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे. आरोग्य शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि खेळ या सर्वांचा स्पोर्ट्स आणि वेल बीईंग या विषयात समावेश करण्यात आला आहे. नववीचे स्पोर्ट्स आणि वेल बीईंगचे पाठपुस्तक लवकरच बाजारपेठेत उपलब्ध केले जाणार आहे, असे मंडळाने म्हटले आहे.