Home बातम्या इमारतीवरून पडून कामगार ठार

इमारतीवरून पडून कामगार ठार

0

दोनापावल येथील मणिपाल इस्पितळाजवळ बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीवरून पडून शिवकृपासिंह बदीचोड (२५) हा ओरिसा येथील कामगार ठार झाला. पहाटे ४ वा. ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

बांधकाम चालू असलेल्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तो झोपला होता. पहाटे ४ च्या दरम्यान तो वरून पडल्याने ठार झाला. पणजी पोलिसांनी पंचनामा केला.