येत्या 20 नोव्हेंबरपासून पणजीत सुरू होत असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 81 देशांतील 243 चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यात 13 वर्ल्ड प्रीमियर, 5 आंतरराष्ट्रीय प्रीमियर व 44 आशियाई प्रीमियरचा समावेश असेल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
महोत्सवाचा शुभारंभ ब्राझिलचे दिग्दर्शक गाबिएल मास्कारो यांच्या ‘द ब्लयू ट्रलेल’ या विज्ञानपटाने होणार आहे. या वर्षीच्या इफ्फीत प्रकाशझोत असेल तो जपानी चित्रपटांवर. तर स्पेन हा सहकारी देश व ऑस्ट्रेलिया ही ‘स्पॉटलाईट कंट्री’ असेल. यंदा महिला दिग्दर्शकांचे 50 चित्रपट दाखवण्यात येतील. तसेच वेब व ओटीटी चित्रपटांसाठीही पुरस्कार असतील. इंडियन पॅनोरमामध्ये 25 फिचर फिल्म्स व 20 नॉनफिचर फिल्म्स असतील. त्याशिवाय 5 पदार्पणातील चित्रपट असतील. त्यात ‘अमटन’ (तामिळ) तर नॉनफिचर फिल्म विभागात कोकरी हा शुभारंभी चित्रपट असेल.
रजनीकांत यांचा सत्कार
दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीत 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल समारोप सोहळ्यात त्यांचा सत्कार करण्यात येणार. वेव्हस् फिल्म बझारमध्ये 300 चित्रपट प्रकल्प असतील. स्क्रिन रायटर्स लॅब, को-प्रॉडक्शन मार्केट आदींचा त्यात समावेश असेल. को-प्रॉडक्शन मार्केटमध्ये 22 चित्रपट व 5 लघुपट असतील. त्यातील विजेत्या चित्रपटाला 20 हजार डॉलर्स मिळतील.

