इफ्फीच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

0
24

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) च्या तयारीच्या कामाचा आढावा काल गोवा मनोरंजन संस्थेच्या कार्यालयात आयोजित एका बैठकीत घेतला.
येत्या २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान ५३ व्या इफ्फीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग व इतर वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.

यावेही इफ्फीच्या कार्यक्रम स्थळांवरील तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच सर्व संबंधित विभागांना कामे पूर्ण करण्यासाठी मुदत निश्‍चित करण्यात आली. इफ्फीदरम्यान वाहतूक सुरळीत ठेवून नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस, वाहतूक विभागाला देण्यात आले.