इन्फोसिस, टीसीएससह अनेक आयटी कंपन्यांना अमेरिकेकडून झटका

0
12

मेरिकेच्या कामगार विभागाने इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि एचसीएल या मोठ्या आयटी कंपन्यांसह काही कंपन्यांना पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम (पीईआरएम) मधून निलंबित केले आहे. परदेशी कामगारांना कायमस्वरूपी अमेरिकेत राहण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी असलेल्या या प्रक्रियेचा गैरवापर केल्याचा आरोप कंपन्यांवर करण्यात आला आहे.

पीईआरएम ही अमेरिकेच्या कामगार विभागाची महत्त्वाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे कंपन्यांना परदेशी कर्मचाऱ्यांसाठी ग्रीन कार्ड मिळविण्याची प्रक्रिया सुरू करता येते. संबंधित पदासाठी पात्र अमेरिकन कामगार नसल्याचे नियोक्त्याला कामगार विभागाला दाखवावे लागते.
परदेशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे अमेरिकन कामगारांच्या नोकऱ्या, वेतन किंवा कामाच्या परिस्थितीवर परिणाम होऊ नये, हा पीईआरएम प्रक्रियेचा
उद्देश आहे.