इटलीहून खलाशांना घेऊन आज तीन विमाने गोव्यात

0
144

इटलीमधून ४४१ खलाशांना घेऊन येणारी खास तीन विमाने बुधवार २० मे २०२० रोजी दाबोळी विमानतळावर दाखल होणार आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी पी. एस. रेड्डी यांनी काल दिली.
या तीन विमानांतून येणार्‍या खलाशांची कोविड तपासणी करून त्यांना हॉटेलमध्ये क्वांरटाईन केले जाणार आहे. खलाशांचे क्वारंटाईन शुल्क देण्याचे कंपनीने मान्य केले आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत अडकलेले ६८ गोमंतकीय येत्या २२ मे रोजी खास विमानाने मुंबईत दाखल होणार आहेत, अशी माहिती अनिवासी भारतीय आयुक्तालयाच्या नोडल अधिकार्‍यांनी राज्य कार्यकारी समितीला दिली आहे. दरम्यान, मुंबईत दाखल होणार्‍या गोमंतकीयांना आणण्यासाठी कदंब महामंडळाशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे.

दाबोळी विमानतळावर
चार स्मार्ट केंद्रे ः राणे
दाबोळी विमानतळावर विमानातून येणार्‍या प्रवाशांची कोविड तपासणी करण्यासाठी ४ स्मार्ट केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली. विमानतळावर येणार्‍या प्रवाशांची कोविड चाचणी अहवाल जाहीर होईपर्यंत त्यांना सरकारी क्वारंटाईऩ सुविधेमध्ये ठेवण्यात येणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.