दोन भारतीय मच्छीमारांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या इटलीच्या दोन खलाशांची भारतात पाठवणी केल्याच्या निषेधार्थ काल इटलीचे विदेश मंत्री गिलिओ तेरझी यांनी पदाचा राजीनामा दिला. या विषयी तेरझी यांनी इटलीच्या संसदेत निवेदन केले.
वरील प्रकरणी निर्णय घेताना आपली मते विचारात घेण्यात न आल्याचा निषेध म्हणून राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. देशाची, लष्कराची व राजनैतिकतेची प्रतिष्ठा जपणे आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला.

