Home बातम्या इजिप्तमधील हिंसाचाराची जगभरातून निंदा

इजिप्तमधील हिंसाचाराची जगभरातून निंदा

0

इजिप्तमध्ये पदच्युत राष्ट्राध्यक्ष महमद मोर्सी यांच्या समर्थकांचे आंदोलन चिरडून टाकण्याच्या कारवाईमुळे ठार झालेल्यांची संख्या ५२५ वर गेल्याने इजिप्तमधील लष्करी राजवटी विरुद्ध जगभरातून टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. फ्रान्सने या घटनेमुळे नागरी युद्धाचा धोका व्यक्त केला आहे. तर तुर्कस्तानने या प्रकरणी संयुक्त राष्ट्र संघाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

इजिप्तच्या लष्करी राजवटीने कायरो येथील निदर्शकांच्या छावण्यांवर हल्ले चढवल्यानंतर त्यात ५२५ निदर्शक ठार झाल्याचे वृत्त आहे. इजिप्तमधील या हिंसाचारामुळे फ्रान्स, ब्रिटन व जर्मनी या देशांच्या प्रशासनांनी तेथील इजिप्तच्या राजदुतांना पाचारण करून तीव्र चिंता व्यक्त केली. तुर्कस्तानचे पंतप्रधान रेसेप एर्डोगन यांनी या विषयावर कृतीसाठी तातडीने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.