इअरफोन लावून रेल्वे रुळावरून चालणे बेतले तरुणाच्या जीवावर

0
16

सांकवाळ रेल्वे स्थानकाजवळील घटना

साकवाळ रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास रेल्वेच्या धडकेत एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. इअरफोन लावून रुळावरून चालत असताना धावत्या रेल्वेने धडक दिल्याने त्याला जीव गमवावा लागला. झारखंडमधील अरुण होरो (23) असे मृत तरुणाचे नाव आहे.
वास्को रेल्वे स्थानकाच्या डेप्युटी स्टेशन मास्टरने दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती हेडफोन लावून आणि मोबाईल फोनवर बोलत रुळांवर चालत होती, तेव्हा समोरून येणाऱ्या रेल्वेने त्याला धडक दिली. कासावली आणि सांकवाळ दरम्यानच्या मार्गावर ही घटना घडली.

यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यावेळी सदर तरुण मृतावस्थेत रुळाच्या बाजूला पडलेला आढळला, त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. वास्को रेल्वे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. डीवायएसपी गुरुदास कदम यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.