‘इंडिया’ आघाडी5 मुद्द्यांवर लढणार

0
13

सोमवारी ‘इंडिया’ आघाडीच्या सातव्या बैठकीत 25 पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला. उद्धव ठाकरे आणि हेमंत सोरेन यांनी दिल्लीत झालेल्या या बैठकीत आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने सहभाग नोंदवला, तर सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, सुप्रिया सुळे आणि कपिल सिबल यांसारख्या नेत्यांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवली. या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषद घेतली. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत पाच मुद्द्यांवर एकमत झाले असून, या मुद्द्यांवर आम्ही काम करणार आहोत, लढणार आहोत आणि पुढे जाणार आहोत, असे खर्गे यांनी सांगितले.