देशभरातील आघाडीच्या पर्यटन आस्थापने, हॉटेल्स, माध्यमे यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत काल येथील पणजी कम्युनिटी सेंटरमध्ये इंडिया ट्रॅव्हल मार्ट प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
तीन दिवस चालणार्या या प्रदर्शनाला राज्य पर्यटन खाते व पर्यटन विकास महामंडळाचे पाठबळ लाभले असून पर्यटन खात्याचे संचालक अमेय अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.पर्यटनास जाऊ इच्छिणार्यांसाठी या प्रदर्शनात त्या संदर्भात तपशीलवार माहितीसह मार्गदर्शन मिळणार आहे. अशा ग्राहकांसाठी विविध पॅकेजीस उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. सकाळी ११ ते संध्या. ७ अशा वेळेत ते प्रदर्शन खुले राहणार आहे. गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, केरळ आदी राज्यांच्या पर्यटन खात्यांचे स्टॉल्स या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
या प्रदर्शनामुळे गोव्याच्या पर्यटनास लाभ होणार असल्याचे इंडियन ट्रॅव्हल मार्टचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अजय गुप्ता यांनी सांगितले.

