इंग्रज व केंद्रसरकारात फरक नाही : हजारे

0
86

केंद्रातील मोदी सरकारवर बोचरी टीका करीत अण्णा हजारे यांनी येथील जंतर मंतरवरील आपल्या आंदोलनाला सुरुवात केली. शेतकर्‍यांवर अन्याय करणारा भूसंपादन अध्यादेश जारी करणार्‍या केंद्र सरकार आणि स्वातंत्र्यपूर्ण काळातील इंग्रजांची राजवट यात कोणताही फरक नसल्याची तिखट प्रतिक्रिया हजारे यांनी यावेळी व्यक्त केली.भूसंपादन विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा हक्क काढून घेत केंद्र सरकारने इंग्रजांसारखीच हुकूमशाही सुरू केली असल्याचा आरोप हजारे यांनी केला. काल हजारे यांच्या आंदोलनात मेधा पाटकर याही सहभागी झाल्या. भूमी अधिग्रहण कायदा आणून केंद्र सरकार शेतकर्‍यांची छळणूक करीत आहे. केंद्रात सत्तापालट झाल्यानंतर आतापर्यंत फक्त उद्योजकांनाच अच्छे दिन आले आहे, अशी टिकाही हजारे यांनी केली. जनतेची सेवा करण्यासाठी लोकांनी यांना सत्तेवर आणले. मात्र हेच सत्ताधारी आता जनतेला सतावत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.