कला अकादमी साहित्य पुरस्कार वाढवणार
गोवा कला अकादमीतर्फे दरवर्षी देण्यात येणार्या साहित्य पुरस्कारांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव असून यासंबंधी लवकरच निर्णय घेणार असल्याचे गोवा कला अकादमीचे अध्यक्ष तथा आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी सांगितले.
यापूर्वी अकादमीतर्फे वेगवेगळ्या साहित्य प्रांतासाठी वेगवेगळे मिळून पाच पुरस्कार देण्यात येत होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून ते बंद करून कोकणी व मराठीसाठी प्रत्येकी एक पुरस्कार देण्याची प्रथा सुरू करण्यात आली.
पुरस्कारांच्या बाबतीत प्रत्येक प्रांताला न्याय मिळावा अशी लेखक कवी, साहित्यप्रेमींची मागणी होती. वाघ यांना त्याची दखल घेऊन पुरस्कारांची संख्या वाढविण्याचा विचार केला आहे. गोव्यात स्थायिक झालेले किंवा गोमंतकीय हिंदी व इंग्रजी भाषेतही साहित्य निर्मिती करतात. त्यांच्यासाठीही पुरस्कार योजना सुरू करण्याचा विचार असल्याचे वाघ यांनी सांगितले.

