Home बातम्या आसारामविरुद्ध आरोप निराधार, एफआयआरमध्ये घोळ

आसारामविरुद्ध आरोप निराधार, एफआयआरमध्ये घोळ

0

जेठमलानी यांचा युक्तीवाद

आसाराम यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या मुलीला गंभीर आजार जडला असून यात ‘स्त्री पुरुषाकडे आकर्षित होते’ असे आसाराम यांचे वकील राम जेठमलानी यांनी राजस्थान हायकोर्टात सांगितले.

सर्व आरोप, एफआयआर व मुलीचे नोंदवले गेलेले वय यात घोळ असल्याचे सांगून यात तपासाची गरज त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आसाराम यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता आज १८ रोजी होणार आहे. या केसची नोंदवही पोलिसांनी सादर करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले. सरकारी पक्ष आज युक्तीवाद करणार आहे.

वैयक्तिक डॉक्टरची मागणी फेटाळली

दरम्यान, आसाराम व त्यांचा अनुयायी शिवा याला काल सत्र न्यायालयात उभे केले असता त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ३० सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. यावेळी आसाराम यांनी वैयक्तिकरित्या कोर्टाला आपल्या खासगी डॉक्टरांचा उपचार घेऊ द्यावा अशी विनंती केली. मात्र कोर्टाने ती फेटाळली. आपणास दुर्धर मानसिक आजार जडला असून त्याचे नाव ‘त्रिनाडी शूल’ असल्याचे त्यांनी सांगितले. या आजारात निद्रानाश होतो असे त्यांनी सांगितले.