आसाम, त्रिपुरात आज लोकसभेसाठी मतदान

0
56
आसाम व त्रिपुरा या राज्यांमध्ये लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज सोमवारी होणार आहे. विशेष म्हणजे या राज्यांमध्ये भाजपचा जाहीरनामा आजच प्रसिध्द होणार आहे. पक्षांतर्गतच्या मतभेदांमुळे भाजपच्या जाहीरनामा प्रसिध्दीस विलंब झाल्याचे सांगण्यात आले.

पाच जागांसाठी या राज्यांमध्ये मतदान होणार आहे. मात्र ज्या भागांमध्ये मतदान होणार आहे तेथे जाहीरनामा प्रसिध्द करण्यास मान्यता दिली जाणार नसल्याचे निवडणूक आयोगाच्या एक वरीष्ठ अधिकार्‍याने सांगितले. निवडणूक नियमावलीच्या कलम १२६ भाग १ ब नुसार मतदानाच्या ४८ तास अधिपर्यंत राजकीय पक्षांना कोणताही प्रचार करता येत नाही असे या अधिकार्‍याने सांगितले.