31 C
Panjim
Saturday, January 16, 2021

आशादायक

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया बनवीत असलेल्या ऑक्सफर्ड – ऍस्ट्राझेनेकाच्या कोरोनावरील लशीच्या आपत्कालीन वापरास भारतीय औषध नियंत्रकांनी परवानगी द्यावी अशी शिफारस सरकारच्या तज्ज्ञ समितीने काल केली. नववर्षाच्या पहिल्या दिवसाचा मोका साधून ही आशावर्धक घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होतीच. औषध नियंत्रकांकडूनही सदर कंपनीला ही सशर्त परवानगी दिली जाईल असे दिसते आहे, कारण काल एका जाहीर कार्यक्रमात त्या पदावरील व्ही. जी. सोमाणी यांनी भारत सरकार अशा प्रकारे कोरोनावरील लशींच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यास अनुकूल असल्याचे संकेत दिले आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठी लस बनवण्याची जोरदार स्पर्धा जगभरामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून लागलेली आहे. वैद्यकीय चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हे लस उत्पादक आहेत. अमेरिकेच्या फायझरने त्यासंदर्भात आघाडी घेतली आणि त्या पाठोपाठ ऑक्सफर्डच्या लशीने आपला क्रमांक लावला. ब्रिटनमध्ये प्रत्यक्ष लसीकरणास प्रारंभही झाला, परंतु कोरोनाच्या नव्या रूपाचे अंश आढळून आल्याची बातमी जगावर येऊन आदळली आणि पुन्हा चिंतेचे सावट निर्माण झाले. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या लशी या विषाणूच्या नव्या रूपावरही मात करू शकतील असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत असल्याने आशेला जागा आहे. जगामध्ये जे कोरोनाचे रुग्ण आढळून आले, त्यामध्ये अमेरिकेपाठोपाठ भारताचा क्रमांक होता. सुदैवाने भारतामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले राहिले आणि या संकटातून बर्‍याच अंशी आपण सुखरूप बाहेर पडू शकलो. आता लस उपलब्ध होताच किमान या विषाणूच्या घातक परिणामांना तरी आपल्याला सामोरे जावे लागणार नाही.
सिरम इन्स्टिट्यूटने लस वापराच्या परवानगीसाठी सहा डिसेंबरला अर्ज केला होता. त्याच्या पाठोपाठ भारतएनबायोटेकनेही आपला अर्ज दुसर्‍याच दिवशी सादर केला होता. त्यामुळे तज्ज्ञ समितीकडून त्या लशीसंदर्भातील माहितीचेही विश्लेषण केले जात आहे आणि सिरमप्रमाणेच त्यांच्या लशीच्या आपत्कालीन वापरासही सशर्त परवानगी देण्याची शिफारस समितीकडून सरकारकडे केली जाईल असे दिसते. सरकारलाही अशा प्रकारची सशर्त परवानगी देण्यावाचून दुसरा पर्याय नाही, कारण जनतेला दिलासा हवा आहे. मात्र, या अहमहमिकेपोटी पुरेशा वैद्यकीय चाचण्यांच्या आधीच अशा प्रकारे परवानगी दिल्याने ती लस घेणार्‍या रुग्णांमध्ये काही वैद्यकीय गुंतागुंत तर निर्माण होणार नाही ना, काही दुष्परिणाम तर होणार नाहीत ना याची काळजी घेणेही गरजेचे आहे. नववर्षाचा मुहूर्त साधून लशीच्या वापराला परवानगी देणे हे प्रतिकात्मकदृष्ट्या ठीक असले तरी पूर्ण विचारांतीच सरकारने लसीकरणास परवानगी देणे आणि त्या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणे गरजेचे असेल.
भारतामध्ये आणखीही काही लस उत्पादक वैद्यकीय चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. झायडस कॅडिलाची लस दुसर्‍या टप्प्यात आहे. रशियाची ‘स्पुतनिक’ लसही भारतात डॉ. रेड्डीजद्वारे बनविली जात आहे. लसीची जनतेला आत्यंतिक प्रतीक्षा आहे हे तर खरेच आहे, परंतु त्यांचे प्रत्यक्ष वितरणही शिस्तशीर पद्धतीने करणे ही सरकारची जबाबदारी ठरते. सिरम इन्स्टिट्यूट बनवीत असलेली लस सामान्य फ्रीजमध्ये सहा महिनेपर्यंत राहू शकते आणि ती स्वस्तही आहे. त्यामुळे भारतासारख्या देशासाठी हे वरदानच आहे. फायझरची लस उणे सत्तर अंश तापमानात ठेवावी लागते, जी भारतात सर्वत्र साठवणे शक्य नाही. त्यामुळे ऑक्सफर्डच्या लशीवरच सध्या तरी भारताची सारी मदार आहे. येणार येणार म्हणता म्हणता अखेर लस आली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आशेची ज्योत त्यामुळे देशामध्ये जरूर जागली आहे!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचे

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...

ALSO IN THIS SECTION