आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार; अन्‌‍ निदर्शने

0
3

आल्तिनो-पणजी येथील गोवा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (सीओए) नोंदणी क्रमांक न दिल्याबद्दल वर्गावर बहिष्कार घालून काल निदर्शने केली.
आर्किटेक्चर महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरतर्फे नोंदणी क्रमांक दिला जातो. कौन्सिलचा नोंदणी क्रमांक नसल्यास आर्किटेक्चर काम करू शकत नाही. अंतिम वर्षात असलेल्या काही विद्यार्थ्यांनाही नोंदणी क्रमांक देण्यात आलेले नाहीत. शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक देण्यात आलेला नाही, अशी माहिती विद्यार्थी नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

विद्यार्थ्यांसाठी नोंदणी क्रमांक महत्त्वाचे आहेत; कारण त्यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर सीएओकडे आर्किटेक्ट म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी क्रमांक नसल्यास व्यवसाय करू शकत नाही. याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून योग्य स्पष्टीकरण मिळालेले नाही, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.