आरोग्य, फ्रंटलाईन कामगार व ज्येष्ठांना आजपासून बूस्टर डोस

0
5

राज्यातील आरोग्य व फ्रंटलाईन कामगार आणि ६० वर्षावरील को-मोर्बिड नागरिक मिळून सुमारे २८००० जण पहिल्या दिवशीच्या बूस्टर डोससाठी पात्र आहेत.

बूस्टर डोस आज सोमवार दि. १० जानेवारीपासून देण्यास प्रारंभ केला जाणार आहे. राज्यात आरोग्य केंद्र आणि गोमेकॉमध्ये लाभार्थींना बूस्टर डोस दिला जाणार आहे, अशी माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी काल दिली.

कोविड लशीचे दोन डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेले आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कामगार आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक बूस्टर डोससाठी पात्र आहेत. दरदिवशी लाभार्थीची संख्या वाढत जाणार आहे.

राज्यात आवश्यक प्रमाणात बूस्टर डोस उपलब्ध करण्यात आलेला आहे. बूस्टर डोससाठी पात्र असलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि ६० वर्षावरील को-मोर्बिड नागरिक थेट आरोग्य केंद्रांवर जाऊन डोस घेऊ शकतात, असेही डॉ. बोरकर यांनी सांगितले.