आरोग्य केसांचे

0
498

 

 

 

 

  •  डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय)

 

प्रकृती व शरीरातील दोष, धातुसारख्या गोष्टी हे केस, नख, त्वचा इत्यादींचे स्वरुप, घड़ण, कांति ठरवत असतात आणि ही प्रक्रिया नैसर्गिक असते. कुठल्याही अनैसर्गिक व शरीराला घातक ठरतील अश्या गोष्टी वापरुन त्या बदलणे म्हणजे साङ्ग चुकीचे आहे.

 

डोक्यावरील व तेथील केसांच्या वेगवेगळया तक्रारी असू शकतात जसे की केस गळणे (मग ते संपूर्ण डोक्यावरचे एकसारखे असतील किंवा एखाद्या विशिष्ट भागावरचे असतील) व तुटणे, केस पिकणे, कोंडा होणे, डोक्याला खाज येणे, डोक्यात ङ्गोड येणे व यांसारख्या इतर.

तर अश्या काही गोष्टी आहेत ज्या ह्या सर्व तक्रारींसाठी कारणीभूत ठरतात. केस हे खूपच नाजुक असतात व केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. सर्वप्रथम केसांना काहीही व कुठलेही गरम पदार्थ, गोष्टी लावणे टाळावे आणि त्यांच्याशी संपर्क यायला नको. कडकडीत गरम पाण्याने आंघोळ (डोक्यावरुन) करु नये. शक्यतो कोमट पाणी (जे शरीराला  सहन होईल अश्या तापमानाचे) वापरावे. कारण गरम पाण्याने केसांना व केसांच्या मुळानां (हेअर ङ्गॉलीकल्स) मार बसतो. तसेच गरम वाङ्गा किंवा हीट (थर्मल रिकंडीशनिंग इ.), वारा (हेअर ड्रायर इ.) हे केसानां देऊ नये. ब्लीचींग क्रीम (हेअर डाय, कलरिंग), हेअर जेल, हेअर स्ट्रेटनिंग क्रीम (कायम-पर्मनेन्ट किंवा तात्पुरते-टेम्परेरी केमिकल रिकंडीशनिंग) सारखे उष्ण पदार्थ केसांना लावल्याने केसांची प्राकृतिक रचना बिघडते. ह्या सर्व गोष्टी त्या त्या काळापुरत्या बर्‍या वाटतात पण त्यांचे साईड इङ्गेक्ट्स हे खूप घातक असू शकतात जे बहुतांश वेळा काही काळ गेल्यावर दिसु लागतात.

प्रत्येक मनुष्याची एक ठराविक शरीररचना असते. सगळयांमध्ये  अवयव जरी समान असले (प्राकृत व्यक्तिच्या शरीरामध्ये) तरी त्यांची प्रकृती मात्र भिन्न असते व ती जन्मापासून मरेपर्यंत त्या त्या व्यक्तिमध्ये एकच असते आणि तशीच राहते. प्रकृती ही बदलत नसते. प्रकृती व शरीरातील दोष, धातु सारख्या गोष्टी हे केस, नख, त्वचा इत्यादींचे स्वरुप, घड़ण, कांति ठरवत असतात आणि ही प्रक्रिया नैसर्गिक असते. कुठल्याही अनैसर्गिक व शरीराला घातक ठरतील अश्या गोष्टी वापरुन त्या बदलणे म्हणजे साङ्ग चुकिचे.

केस गळणे हे अनुवंशिकसुद्धा (जेनेटीकल डीङ्गेक्ट- शरीरातील जीन्समुळे) असु शकते. म्हणजेच जर वडील, आजोबा इतरांमध्ये टक्कल पडणे  यांसारख्या तक्रारी असतील तर त्यांच्या मुलांमध्ये हे प्रमाण जास्त करुन होऊ शकते. मूलींमध्ये हे प्रमाण शक्यतो कमी आढळते.

हस्तमैथुन किंवा मैथुन हे अतीप्रमाणात केल्यामुळे शुक्रक्षय होतो (आयुर्वेदानुसार शुक्र हे सर्वशरीरव्यापी असते व सर्वात अंतिम धातु आहे जो बाकिच्या धातुंपासुन बनतो- म्हणजेच रस-रक्त-मांस-मेद-अस्थि-मज्जा-शुक्र ह्या क्रमाने) व त्यामुळे सर्व धातुंची उत्पत्ती व्यवस्थित होत नाही व त्यामध्ये एकप्रकारचे शैथिल्य येते आणि ह्याचमुळे केससुद्धा गळू लागतात (केस हे अस्थि आणि मज्जा या धातुंपासुन बनतात).

मानसिक तणावमुळेही केस गळू शकतात जसे की जास्त प्रमाणात रागराग (क्रोध) केल्याने शरीरातील दोषांचा (त्रिदोष) प्रकोप होतो. विशेष करुन पित्तदोष जो रक्त धातुला दूषित करुन केसांचे पोषण बिघडवितो व पोषण योग्य न झाल्याने केस तूटु लागतात. ह्या व्यतिरिक्त चिंता, शोक करणे, भिती वाटणे यांसारख्या मानसिक तक्रारींचा अतियोग झाल्यानेसुद्धा केस गळतात व पिकतात. तसेच ट्रिकोटीलोमेनिया सारख्या मानसिक व्याधी ज्यामध्ये मनुष्याला स्वतःचेच केस ओढ़ायची (हेअर पुलिंग) इच्छा होत असते व ते करतातही. ही एक प्रकारची ओब्सेसिव कम्पलसिव डिसॉर्ड़र आहे.

पॅटर्न ऍलोपेसिया, नॉन पॅटर्न ऍलोपेसिया, ऍलोपेसिया एरिएटा इ.सारख्या प्रकारांमुळे हेअर लाईन कमी कमी होत जाते व नंतर टक्कल दिसू लागते.

मद्यपान, धुम्रपान, अंमली पदार्थ यांच्या अतिसेवनानेही केसांवर वाईट परिणाम होतो. तसेच आहारामध्ये तिखट, आंबट, खारट, क्षारिय पदार्थ, ङ्गास्ट ङ्गुड (नुडल्स, पिझ्झा, बाहेरील गाड्यावरचे एकाच व जूनाट तैलामध्ये तळलेले पदार्थ इ.), चॉकलेट्स, केन्ड ङ्गुड, चायनीज ङ्गुड (विशेषत: अजिनामोटोयुक्त जे शरीरातील शुक्रसाठी घातक आहे, शुक्राणुंचे प्रमाण कमी करते इ.), शीतपेय (कार्बोनेतेड कोल्ड ड्रिंक्स) यांचा अतिप्रमाणात वापर टाळावा. अश्याने पित्त (केसांसम्बंधी विशेषत: भ्राजक पित्त जे त्वचेमध्ये असते व रंजक पित्त जे केसांना प्राकृत रंग देण्याचे काम करते) व रक्त दूषित होतात. विकृत कङ्ग वाढल्याने केसांच्या मुळामध्ये अवरोध (ब्लॉक) निर्माण होतो जे केसांचे पोषण थांबवीते.

डोक्यातील व्याधिंमुळे केसांवर परीणाम होतो जसे की एक्झिमा, सतत डोकेदुखी, कर्करोग, कृमी (पोटातील कृमीही तेवढ़्याच कारणीभूत ठरतात). आधुनिक औषधांच्या (केमिकल्स, अँटीबायोटिक्स, स्टेरॉइड्स, गर्भनिरोधक/कोण्ट्रासेप्टिव्‌स, हेअर स्प्रे इ.), थेरपीच्या (कर्करोगावरची कीमोथेरपी इ.) अती वापरानेसुद्धा केस जातात.

आधुनिक औषधांमध्ये मेल पॅटर्न बाल्डनेससाठी मिनोक्सीडील हे सोल्यूशन किंवा ङ्गोमच्या स्वरुपात वापरले जाते. तसेच ङ्गिनास्टेराईड सुद्धा वापरले जाते. काही लोकांमध्ये नवीन केस येऊही लागतात. पण वापरणे बंद केल्यावर पुनः केस गळणे चालु होते आणि इङ्गेक्ट्सपेक्षा साईड इङ्गेक्ट्सच जास्त आहेत. मिनोक्सीडीलच्या अतिवापराने डोक्याला अतितीव्र खाज येणे व इरिटेशन होणे, चेहर्‍यावर अवांछित/नको असलेल्या नवीन  केसांची उत्पत्ति, छातीमध्ये वेदना, हृदयाची धडधड वाढणे, शरीरभार/वजन वाढणे, हातापायांना सुज येणे, डोकेदुखी, चक्कर येणे, विचारांचा गोंधळ इत्यादी. तर ङ्गिनोस्टेराईडमुळे नपुंसकत्व, शारिरीक सम्बंध ठेवण्यास इच्छा नसणे, अस्वाभाविक शुक्रस्खलन (ईजॅकुलेशन) होणे, ओरगॅजमचा त्रास (समागमाच्या वेळी शिगेस पोहचलेली उत्कटता होण्यास कष्टता), थकवा, चक्कर येणे, स्तनांना सुज येणे किंवा घट्ट झाल्याने दुखु लागणे, हातापायानां सुज येणे सारखे साईड इङ्गेक्ट्स असतात. म्हणुनच वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापरु नये किंवा शक्यतो टाळावे.

तसेच क्लोरिनेटेड पाणी (जे पाणी शुद्धीकरणासाठी वापरतात, स्विमिंग पुलमध्येसुद्धा), बोअरवेलचे पाणी (हार्ड वॉटर-ज्यात साबणाचा ङ्गेस येत नाही असे पाणी), हीटर मेटल कॉईलने गरम केलेले पाणी प्यायला व आंघोळीला वापरल्याने केस कोरडे होऊन गळु लागतात व केसांचा रंग बदलतो, पिंगट होतात). ज्यांचे केस घन, दाट आहेत व केस गळतात त्यांनी जाड़ दातांचा (ब्रिसल्स) कंगवा वापरणे टाळावे (त्यामध्ये केस अडकुन तूटु शकतात). शक्य असल्यास लहान बाळांचा कंगवा (बेबी कोम्ब) वापरावा कारण ह्या कंगव्याच्या दातांच्या टोकानां एक प्रकारचे संरक्षण असते जे डोक्याला इजा पोहोचवीत नाही. तसेच पुन: पुन: केस विंचरणेसुद्धा अयोग्य आहे. अश्याने केसांना मार बसतो. केसांची रचना (स्टाईल) बदलत राहु नये. ह्यानेदेखील केस कमकुवत होतात.

टीव्हीवरची व इतर जाहिरातींमध्ये दाखविलेल्या सौंदर्यप्रसाधनांना (इथे केसासम्बंधी) बळी पडू नका. दाखविलेली प्रत्येक गोष्ट ङ्गायदेशीर ठरेलच असे नाही. प्रत्येक व्यक्तिची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये चुकून जर ङ्गायदा (त्याच्या नशिबाने) झालाच तर तुम्हालाही ङ्गायदा होईल असे नाही. सावध राहुनच वापरा आणि प्रत्येक प्रोडक्ट् बदलतसुद्धा राहु नका. नाहीतर असे होईल की एका महिन्यात केसांना १० प्रकारचे शैम्पू इ. वापरुन केसांनासुद्धा गोन्धळात टाकाल की नक्की कुठले चांगले आहे त्यांच्यासाठी आणि कुठले अयोग्य.

केशरोपण (हेअर ट्रांसप्लांट) हा शेवटचा पर्यायही उपलब्ध असतो (सहसा त्याच व्यक्तिधील  डोक्याचा मागील किंवा बाजुचे स्वस्थ केस त्यांचा मुळासकट काढुन जेथे केस नाही आहेत तेथे अश्या पद्धतीने पुनःरोपण केले जातात/लावले जातात की जेथून ते काढले गेलेत, तेथील केशरचनासुद्धा बिघडू नये. आयुर्वेदानुसार केस गेलेल्या जागेवर योग्य औषधांचा लेप लावणे, शिरोधारा (डोक्यावर औषधी पातळ द्रव्याची, दुधाची, तैलाची, ताकाची कोमट किंवा थंड अशी बारीक धार सोडणे), शिरोपिचू(डोक्याच्या मध्यभागी औषधी द्रव्याने भिजवीलेला कापुस काही काळ तेथे ठेवणे), शिरोभ्यंग (डोक्याला औषधीयुक्त कोमट तैलाने मालिश करणे), शिरोबस्ति (डोक्यावर एक विशिष्ट पात्रामध्ये कोमट औषधीयुक्त तैल भरुन गरजेनुसार काही काळ ठेवणे ज्यानेकरुन ते बाहेर येऊ नये), नस्य(नाकामध्ये औषधीद्रव्यांचे थेंब घालणे), रक्तमोक्षण(जेथे केस गेले आहेत तेथील कङ्गाचा अवरोध दूर करायला व दूषित रक्त काढायला प्रच्छान किंवा जलौकावचरण- जिवंत जळु लाउन ते शोषण करणे)सारखे उपक्रम तसेच आभ्यंतर औषधी, पंचकर्म (वमन, विरेचन हे सार्वदैहिक शोधनासाठी वापरतात), बस्ति उपयुक्त ठरतात. भृंगराज (माका), आमलकी (आवळा), ब्राह्मी, रीठा, शिकेकाई इ. सारख्या औषधांचा उपयोग केला जातो पण तेही वैद्यांच्या मार्गदर्शनातच करावे.