Home बातम्या आरोग्यमंत्र्यांनी आश्‍वासनाची पूर्तता न केल्याने आंदोलन

आरोग्यमंत्र्यांनी आश्‍वासनाची पूर्तता न केल्याने आंदोलन

0

मलेरिया कर्मचार्‍यांचा इशारा

गेल्या दोन वर्षांपासून आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सेवेत कायम करण्याचे आश्‍वासन देऊन केवळ झुलवीत ठेवल्याचे कंत्राटी पध्दतीवर काम करणार्‍या खात्यातील मलेरिया सेवकांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. २ नोव्हेंबरपर्यंत सेवेत कायम न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला.

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी एका बाजूने आरोग्य खात्यात मोठ्या प्रमाणात नोकरभरती सुरू केली आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून खात्यात मलेरिया सेवक म्हणून कंत्राटी पध्दतीवर काम करणार्‍यांकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप या सेवकांनी केला.

आतापर्यंत आम्ही दोन वेळा कुटुंबियांसह बेमुदत उपोषण केले. दोन्ही वेळा आरोग्यमंत्र्यांनी सेवेत कायम करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, अजून सेवेत केले. कायम नाही. अशा असंवेदनशील मंत्र्याना म्हणायचे काय, असा प्रश्‍नही या सेवकानी पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित केला.

गरज नसताना शेकडो पेशंट अटेन्टपदे भरली जात असून या लोकाना पगार द्यायला सरकारकडे पैसा आहे. मात्र, ७० मलेरिया सेवकाना सेवेत कायम करण्यासाठी पैसे नाहीत काय, असा सवालही या सेवकांनी उपस्थित केला. पुन्हा आमरण उपोषणाला बसावे की नुसते आंदोलन करायचे यासंबंधीचा निर्णय १ रोजी बैठक घेऊन घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.