29 C
Panjim
Friday, October 23, 2020

आयर्लंडकडून इंग्लंडचा पराभव

>> पॉल स्टर्लिंग, अँडी बालबर्नीची दमदार शतके

कर्णधार बालबर्नी व उपकर्णधार पॉल स्टर्लिंग यांनी दमदार शतके ठोकताना दुसर्‍या गड्यासाठी केलेल्या २१४ धावांच्या भागीदारीच्या बळावर आयर्लंडने तिसर्‍या व शेवटच्या एकदिवसीय सामन्यात यजमान इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव केला. आयर्लंडने विजयासाठीचे ३२९ धावांचे लक्ष्य ४९.५ षटकांत गाठले. या विजयासह आयर्लंडने ‘आयसीसी वर्ल्डकप सुपर लीग’मध्ये गुणांचे खाते उघडताना १० गुणांची कमाई केली. मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून इंग्लंडने मालिका या सामन्यापूर्वीच जिंकली होती.
आयर्लंडने या सामन्यासाठी आपल्या संघात एक बदल करताना अष्टपैलू सिमी सिंग याच्याजागी ‘२०१९’मधील त्यांचा सर्वांत यशस्वी गोलंदाज मार्क अडेर याचा संघात समावेश केला. दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यात तो खेळू शकला नव्हता.

दुसरीकडे इंग्लंडने जायबंदी रिस टॉपली याच्या जागेवर टॉम करनला संघात घेतले. आयर्लंडने यावेळी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीची निर्णय घेताना इंग्लंडला फलंदाजीचे निमंत्रण दिले. दुसर्‍या सामन्यात स्फोटक फलंदाजी केलेला यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बॅअरस्टोव केवळ ४ धावांचे योगदान देऊ शकला. जेसन रॉय याच्या अपयशाची मालिका सुरूच राहिली. पहिल्या दोन लढतींत अनुक्रमे २४ व ० धावा केल्यानंतर काल तो केवळ १ धाव करू शकला. जेम्स व्हिन्स याला पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करता न आल्यामुळे इंग्लंडचा संघ ३ बाद ४४ असा अडचणीत सापडला.

कर्णधार ऑईन मॉर्गन व नवोदित टॉम बँटन यांनी संघाचा कोसळता डोलारा सावरला. मॉर्गनने आपले १४वे वनडे शतक झळकावले तर बँटन याने आपल्या सहाव्या वनडे लढतींत प्रथमच अर्धशतकी वेस ओलांडली. या द्वयीने चौथ्या गड्यासाठी १४६ धावांची भागीदारी रचली. तळाला डेव्हिड विली याने अर्धशतकी वेस ओलांडताना ५१ धावांचे योगदान दिले. भारताविरुद्ध लॉर्डस् मैदानावरील अर्धशतकानंतर तब्बल दोन वर्षांनी विली याने अर्धशतक झळकावले.

टॉम करन ३८ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडचा संपूर्ण डाव ४९.५ षटकांत ३२८ धावांत संपला. आयर्लंडकडून क्रेग यंग याने सर्वाधिक ३ गडी बाद केले. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडला गॅरेथ डिलेनी (१२) याच्या रुपात सुरुवातीला मोठा धक्का बसला. परंतु, अनुभवी पॉल स्टर्लिंग व अँडी बालबर्नी यांनी धावफलक सतत हलता ठेवत मोजूनमापून धोका पत्करला. बालबर्नीच्या तुलनेत स्टर्लिंगने अधिक धोका पत्करत इंग्लंड संघाला सतत दबावाखाली ठेवले. स्टर्लिंगने आपले नववे वनडे शतक ठोकले तर बालबर्नी याने सहावे शतक लगावले. ही दुकली परतल्यानंतरच आयर्लंडची ४४.३ षटकांत ३ बाद २७९ अशी स्थिती झाली होती. हॅरी टेक्टर (२६ चेंडूंत २९) व केव्हिन ओब्रायन (१५ चेंडूंत २१) यांनी नाबाद राहत आयर्लंडला विजयी केले.

धावफलक
इंग्लंड ः जेसन रॉय झे. बालबर्नी गो. यंग १, जॉनी बॅअरस्टोव त्रि. गो. अडेर ४, जेम्स व्हिन्स झे. टकर गो. यंग १६, ऑईन मॉर्गन झे. टेक्टर गो. लिटल् १०६, टॉम बँटन पायचीत गो. डिलेनी ५८, सॅम बिलिंग्स झे. अडेर गो. यंग १९, मोईन अली झे. स्टर्लिंग गो. कँफर १, डेव्हिड विली झे. बालबर्नी गो. कँफर ५१, टॉम करन नाबाद ३८, आदिल रशीद धावबाद ३, साकिब मेहमूद झे. बालबर्नी गो. लिटल् १२, अवांतर १९, एकूण ४९.५ षटकांत सर्वबाद ३२८
गोलंदाजी ः क्रेग यंग १०-१-५३-३, मार्क अडेर ७-०-४५-१, जोशुआ लिटल् ८.५-०-६२-२, कर्टिस कँफर १०-१-६८-२, अँडी मॅकब्रायन ८-०-६१-०, गॅरेथ डिलेनी ६-०-२९-१
आयर्लंड ः पॉल स्टर्लिंग धावबाद १४२ (१२८ चेंडू, ९ चौकार, ६ षटकार), गॅरेथ डिलेनी त्रि. गो. विली १२, अँडी बालबर्नी झे. बिलिंग्स गो. रशीद ११३ (११२ चेंडू, १२ चौकार), हॅरी टेक्टर नाबाद २९, केव्हिन ओब्रायन नाबाद २१, अवांतर १२, एकूण ४९.५ षटकांत ३ बाद ३२९
गोलंदाजी ः डेव्हिड विली १०-१-७०-१, साकिब मेहमूद ९.५-०-५८-०, टॉम करन १०-०-६७-०, मोईन अली ७-०-५१-०, आदिल रशीद १०-१-६१-१, जेम्स व्हिन्स ३-०-२०-०

आयर्लंडचा विश्‍वविक्रम
परदेशात वनडे सामना खेळताना ७ किंवा त्यापेक्षा अधिक गडी राखत सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणार्‍या संघांमध्ये आयर्लंडने अग्रक्रमांक मिळविला.

यापूर्वी हा विक्रम श्रीलंका संघाच्या नावावर होता. त्यांनी इंग्लंडविरुद्ध १ जून २००६ रोजी लीडस् येथे झालेल्या वनडेत ३२२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यावेळी त्यांनी ८ गड्यांनी विजय मिळवला होता. आत्तापर्यंत केवळ ३ संघांनी परदेशात खेळताना वनडेत ७ किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाकी ठेवत ३०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. यात आयर्लंड, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघाचा समावेश आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

वजाबाकी

आयआयटी प्रकल्पावरून झालेल्या आरोप - प्रत्यारोपांनंतर अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी राज्यातील डॉ. प्रमोद सावंत सरकारचा पाठिंबा काढून घेतला. अर्थात, सत्तावीस आमदारांचे...

एटीएम चोरी : दिल्लीत तिघांना अटक

>> दिल्ली पोलिसांची धडक कारवाई >> संशयितांकडून रोख रकमेसह पिस्तूल जप्त आंबिर्ण सुकूर येथील युनियन बँकेचे...

देशभरात ४ एटीएमची टोळक्याकडून चोरी

पर्वरीतील एटीएम चोरीप्रकरणी अटक केलेल्या टोळक्याने देशभरात चार एटीएमची चोरी केल्याचे उघड झाले आहे. पर्वरी गोवा येथे एटीएम चोरी प्रकरणातील मुख्य संशयित...

खनिज वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आलेल्या एका बैठकीत राज्यातील खनिज माल वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित करण्यात आला आहे. खनिज...

लाडली लक्ष्मी योजनेची उत्पन्न मर्यादा ३ लाख

राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजनेत दुरुस्ती केली असून या योजनेची उत्पन्न मर्यादा वार्षिक ८ लाखांवरून ३ लाख रुपयांवर आणण्यात आली आहे. यामुळे...

ALSO IN THIS SECTION

एटीएम चोरी : दिल्लीत तिघांना अटक

>> दिल्ली पोलिसांची धडक कारवाई >> संशयितांकडून रोख रकमेसह पिस्तूल जप्त आंबिर्ण सुकूर येथील युनियन बँकेचे...

देशभरात ४ एटीएमची टोळक्याकडून चोरी

पर्वरीतील एटीएम चोरीप्रकरणी अटक केलेल्या टोळक्याने देशभरात चार एटीएमची चोरी केल्याचे उघड झाले आहे. पर्वरी गोवा येथे एटीएम चोरी प्रकरणातील मुख्य संशयित...

खनिज वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आलेल्या एका बैठकीत राज्यातील खनिज माल वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित करण्यात आला आहे. खनिज...

लाडली लक्ष्मी योजनेची उत्पन्न मर्यादा ३ लाख

राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजनेत दुरुस्ती केली असून या योजनेची उत्पन्न मर्यादा वार्षिक ८ लाखांवरून ३ लाख रुपयांवर आणण्यात आली आहे. यामुळे...

यंदा इफ्फीचे आयोजन १५ जानेवारीपासून शक्य

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) येत्या १५ जानेवारी ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान आयोजित केला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे...