आयपीएल २५ सप्टेंबर ते १ नोव्हे.पर्यंत!

0
120

 

कोरोना महामारीमुळे आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाबाबत संभ्रम आहे. स्पर्धेचे आयोजन न झाल्यास होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी ही स्पर्धा याच वर्षाच्या शेवटाला खेळविता येईल काय याची तपासणीही बीसीसीआयकडून केली जात आहे. बीसीसीआय २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात आयपीएलच्या तेराव्या पर्वाचे आयोजन करण्याचा विचार करीत असल्याचे बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले.

जरी बीसीसीआय वरील कालावधीत आयपीएलचे आयोजन करण्यासाठी उत्सुक असले तरी कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळतानाच आणि सरकारची परवानगी मिळणेही अत्यावश्यक असल्याचे या सूत्राने स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली तर आयपीएलच्या आयोजनासाठीच्या सर्व गोष्टींच्या नियोजनाची तयारीही बीसीसीआयकडून करण्यात आल्याची माहिती या सूत्राने दिली आहे.