Home बातम्या आयपीएलमध्ये ‘स्पॉट-फिक्सिंग’

आयपीएलमध्ये ‘स्पॉट-फिक्सिंग’

0

 विदेशातील अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या बुकींच्या संगनमताने एका षट्‌कात धावा देण्यासाठी ६० लाख रुपये घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. १४ बुकींनाही अटक केलेली असून आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे, तथापि, अन्य कुणा भारतीय वा विदेशी खेळाडूंबाबत काहीही उजेडात आलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

अटक केलेल्यांपैकी काही बुकी हे यापूर्वी दाऊद इब्राहिमसाठी काम करीत होते, अशी माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या खास पथकाने काल पहाटे मुंबईत या तिन्ही खेळाडूंना अटक केली. या घटनेमुळे आयपीएलवर नामुष्की ओढवली असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या तिन्ही खेळाडूंना निलंबित केले आहे.

खास पोलिस पथकाकडे खेळाडू आणि बुकींमधील सुमारे शंभर तासांचे फोनवरील ध्वनिमुद्रित संभाषण आहे, अशी माहिती दिल्ली पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत दिली.

या तिन्ही क्रिकेटपटूंविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४२० आणि १२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच त्यांना ‘एमसीओसीए’ही (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ऍक्ट) लागू करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्यांना जामीन मिळणेही मुश्कील होईल व त्यांचा कबुली जबाब उपअधीक्षक दजार्ंच्या अधिकार्‍याकडून घेतला जाईल. श्रीशांतला त्याच्या मुंबईतील मित्राच्या घरातून तर अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांना मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमधून दिल्ली पोलिसांनी अटक केली. पुणे वॉरियर्स (दि. ५ मे), किंग्ज इलेव्हन पंजाब (दि. ९) आणि मुंबई इंडियन्स (दि. १५) या तीन सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या त्रिकुटाने स्पॉट-फिक्सिंग केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाचे पथक गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत दाखल झाले होते. राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सविरुद्ध सामना सुरू असल्यामुळे बुधवारी संध्याकाळपर्यंत कारवाई करण्यात आली नव्हती पण काल सकाळी त्यांना अटक करण्यात आली.

आयपीएलमधील ५, ९ आणि १५ मेच्या सामन्यांत स्पॉट फिक्सिंग झालं होतं. एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांनी या सामन्यात टाकलेली वैयक्तिक दुसरी ओव्हर फिक्स होती आणि विशिष्ट खाणाखुणा करून ते बुकींसोबतच एकमेकांना इशारा करत होते, असा खुलासा दिल्ली पोलिसांनी चित्रफीती दाखवत केला. स्पॉट फिक्सिंगसाठी श्रीशांतला एका ओव्हरचे ४० लाख, तर चंडिला आणि चव्हाण यांना प्रत्येकी ६० लाख रुपये देण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

श्रीशांत व अन्य जणांना ५ दिवस पोलीस कोठडी

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक केलेल्या क्रिकेटर एस. श्रीशांत, अजित चंडीला व अंकित चव्हाण तसेच अन्य १३ जणांना दिल्लीतील साकेत सत्र न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी दिली. दिल्ली पोलिसांनी कोर्टाला सांगितले की, या प्रकरणात आणखी लोकांच्या सहभागाची शक्यता असून आणखी जणांना अटक होऊ शकते. बूकींनी आणखी काही खेळाडूंवरही पैसे लावले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना दूर ठेवण्यात आले होते.

टॉवेल, मनगटी पट्टा, टी-शर्टद्वारे खाणाखुणा

क्रिकेट सामन्यात खेळ ‘फिक्स’ करण्यासाठी टॉवेल, मनगटी पट्टा, टी-शर्ट यांचा खुणा म्हणून वापर अटक केलेल्या क्रिकेटर्सनी करून बुकींना सूचना केल्याचा आरोप आहे. शिवाय या तिन्ही खेळाडूंनी बुकींना सट्टा लावण्याकरिता मुबलक वेळ मिळावा म्हणून वेळ फुकट घालवल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान, चंडीला हा एक खूण करण्यास विसल्यामुळे बुकींचे मोठे नुकसान झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. ‘फिक्स’ ओव्हर सुरू होण्याअगोदर चंडीला याने टी-शर्ट वर खाली करायचे होते, मात्र तो ते करायला विसरला मात्र ठरल्यानुसार त्याने १४ रन्सचे लक्ष्य पूर्ण केले. त्यामुळे चंडीला याला आगाऊ दिलेले २० लाख रु. परत करावे लागले. श्रीशांतच्या बाबतीत त्याला फक्त फिक्स ओव्हर टाकण्यापूर्वी नॅपकिन पन्टमध्ये खोचून दाखवायचा होता. शिवाय बुकींना वेळ देण्यासाठी श्रीशांत वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करायचे होते. चव्हाणसाठी मनगटी पट्टा फीरविणे ही खूण होती.