29.1 C
Panjim
Wednesday, October 20, 2021

‘आयपीएल’चा तडका आजपासून आखातात

  • सुधाकर रामचंद्र नाईक

‘कोविड-१९’च्या मृत्युतांडवामुळे आकस्मिकपणे अनिश्‍चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आलेल्या बहुचर्चित तथा देश-विदेशांत अङ्गाट लोकप्रियता लाभलेल्या ‘इंडियन प्रिमियर लीग’च्या चौदाव्या पर्वाचा दुसरा टप्पा आज रविवार दि. १९ पासून संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू होणार आहे. ‘आयपीएल’ हा झटपट क्रिकेटचा रोमांचक थरार असून बेङ्गाट ङ्गटकेबाजीचा आविष्कार या इन्स्टंट क्रिकेटमध्ये घडतो. विशेष म्हणजे संयुक्त अरब अमिरातमधील स्टेडियम्स लहान असल्याने षट्‌कार-चौकारांची आतषबाजी क्रिकेटशौकिनांना तृप्त करील अशी अपेक्षा आहे.

इंडियन प्रिमियर लीग विजेते
वर्ष विजेते उपविजेते सामनास्थळ

२००८ राजस्थान रॉयल्स चेन्नई सुपर किंग्ज मुंबई
२००९ डेक्कन चार्जर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळूर जोहान्सबर्ग
२०१० चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्स मुंबई
२०११ चेन्नई सुपर किंग्ज रॉयल चॅलेंजर्स बंगळूर चेन्नई
२०१२ कोलकाता नाइटरायडर्स चेन्नई सुपर किंग्ज चेन्नई
२०१३ मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज कोलकाता
२०१४ कोलकाता नाइटरायडर्स किंग्ज इलेव्हन पंजाब बंगळूर
२०१५ मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज कोलकाता
२०१६ सनरायझर्स हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बंगळूर बंगळूर
२०१७ मुंबई इंडियन्स रायझिंग पुणे सुपरजायंटस हैदराबाद
२०१८ चेन्नई सुपर किंग्ज सनरायझर्स हैदराबाद मुंबई
२०१९ मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज हैदराबाद
२०२० मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स दुबई

‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक धावा
ङ्गलंदाज सामने डाव धावा सरासरी शतके
विराट कोहली १९९ १९१ ६०७६ ३७.९५ ५
शिखर धवन १८४ १८३ ५५७७ ३५.२९ २
सुरेश रैना २०० १९५ ५४९१ ३३.०७ १
रोहित शर्मा २०७ २०२ ५४८० ३२.४९ १
डेविड वॉर्नर १४८ १४८ ५४४७ ४२.२२ ४
ए. बी. डिविलियर्स १७६ १६२ ५०५६ ४०.७७ ३
ख्रिस गेल १४० १३९ ४९५० ४०.२४ ६
महेंद्रसिंह धोनी २११ १८६ ४६६९ ४०.२५ ०
रॉबिन उथप्पा १८९ १८२ ४६०७ २७.९२ ०
गौतम गंभीर १५४ १५२ ४२१७ ३१.२३ ०

‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक बळी
गोलंदाज सामने डाव षटके सर्वोत्तम बळी

लसिथ मलिंगा १२२ १२२ ४१७.१ ५/१३ १७०
अमित मिश्रा १५४ १५४ ५४०.५ ५/१७ १६६
पियुष चावला १६४ १६३ ५४१.४ ४/१७ १५६
ड्वेन ब्रावो १४४ १४१ ४६३ ४/२२ १५६
हरभजन सिंग १६३ १६० ५६९.२ ५/१८ १५०
रविचंद्रन अश्‍विन १५९ १५६ ५५७.२ ४/३४ १३९
भुवनेश्‍वर कुमार १२६ १२६ ४६८.३ ५/१९ १३०
सुनिल नारायण १२४ १२३ ४८०.२ ५/१९ १३०
यजुर्वेद्र चहल १०६ १०५ ३७८ ४/२५ १२५
रविंद्र जडेजा १९१ १६२ ४७६.१ ५/१६ १२०

‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक षट्‌कार
ङ्गलंदाज सामने धावा सरासरी षट्‌कार

ख्रिस गेल १४० ४९५० ४०.२४ ३५७
ए. बी. डिविलियर्स १७६ ५०५६ ४०.७७ २४५
रोहित शर्मा २०७ ५४८० ३१.४९ २२४
महेंद्रसिंह धोनी २११ ४६६९ ४०.२५ २१७
कायरन पोलार्ड १७१ ३१९१ ३०.६८ २११
विराट कोहली १९९ ६०७६ ३७.९७ २०५
सुरेश रैना २०० ५४९१ ३३.०७ २०२
डेविड वॉर्नर १४८ ५४४७ ४२.२२ २०१
शेन वॉटसन १४५ ३८७४ ३०.९९ १९०
रॉबिन उथप्पा १८९ ४६०७ २९.९२ १६३.

‘कोविड-१९’च्या भयकंपित करणार्‍या मृत्युतांडवामुळे आकस्मिकपणे अनिश्‍चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आलेल्या बहुचर्चित तथा देश-विदेशांत अङ्गाट लोकप्रियता लाभलेल्या ‘इंडियन प्रिमियर लीग’च्या चौदाव्या पर्वाचा दुसरा टप्पा आज रविवार दि. १९ पासून संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील पाच वेळचा विजेता ‘मुंबई इंडियन्स’ आणि माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील दोन वेळचा विजेता ‘चेन्नई सुपर किंग्ज’ यांमधील मुकाबल्याने ‘विवो आयपीएल २०२१’च्या शेष पर्वाचा प्रारंभ होईल.

कोरोना महामारीच्या उद्रेकानंतर गतवर्षी बीसीसीआय आणि आयपीएल आयोजन समितीने संयुक्त अरब अमिरातमध्ये केलेल्या तेराव्या पर्वाचे आयोजन निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर यंदा स्वदेशात ही इन्स्टंट प्रतियोगिता आयोजिण्यात आली. एप्रिलपासून चेन्नई, कोलकाता, बंगळूर, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या सहा शहरांतील भव्यतम स्टेडियम्सवर ‘विनाप्रेक्षक’ सामने सुरू झाले आणि क्रिकेटरसिकांसाठी टीव्हीद्वारे का होईना उत्कंठावधर्ंक क्रिकेटची मेजवानी उपलब्ध झाली. पण आकस्मिकपणे पुन्हा कोरोनाचे ‘मृत्युतांडव’ सुरू झाले आणि ‘आयपीएल’चे ‘बायो बबल’ कवचही भेदले गेले. पर्यायाने अखेर ४ मे रोजी आयोजकांना प्रतियोगिता बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेणे भाग पडले.

‘कोरोना-१९’ संक्रमणाची तीव्रता काहीशी कमी झाल्यावर हळूहळू पुन्हा क्रीडाविश्‍व सक्रिय झाले. क्रिकेट, ङ्गुटबॉलसह ऑलिंपिकही बव्हंशी सुखरूपपणे पार पडले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही मे महिनाअखेरीस ‘विवो आयपीएल २०२१’चा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्याचा निर्णय घेतला. जूनपासून टीम इंडियाच्या क्रिकेट अभियानाचा ङ्गेरप्रारंभ झाला. १८ जूनपासून इंग्लंडमधील साउथम्पटन येथील न्यूझिलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट सीरिज ङ्गायनलनंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी मालिका सुरू झाली. भारतीय संघाने दमदार कामगिरी करून मालिकेत २-१ अशी आघाडीही मिळविली; पण मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीसह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधरसह सपोर्ट स्टाङ्गमधील सदस्य कोरोनाबाधित झाल्याने पाचव्या कसोटीचे भवितव्य अधांतरी ठरले आणि पाचव्या व अंतिम कसोटीच्या पूर्वसंध्येला सहाय्यक प्रशिक्षक योगेश परमार ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आढळले आणि अखेर पाचवी कसोटी बेमुदत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरले. दरम्यानच्या कालावधीत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली तथा राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली जुलैमध्ये भारताच्या द्वितीय संघाने श्रीलंकेचा दौरा केला. श्रीलंका दौर्‍याच्या अंतिम टप्प्यातही ‘कोरोना’चा ङ्गटका बसला आणि शिखर धवन आणि कंपनीला एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर टी-२० मालिका गमवावी लागली.

एकंदरीत ‘कोरोना’च्या साथीतही क्रिकेट जारी राखण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सज्ज असून ‘आयपीएल’मधील आठही सहभागी संघांचे निर्धारित वेळेत संयुक्त अरब अमिरातमध्ये आगमन झालेले आहे. इंग्लंडमधील पाचवी कसोटी रद्दबातल ठरल्यानंतर भारतीय खेळाडूही ‘आयपीएल’साठी इंग्लंडहून थेट संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झालेले असून क्रिकेट शौकिनांना आता इन्स्टंट क्रिकेटचा थरार अनुभवण्याचा योग आहे. याआधी २०१४ मधील भारतातील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयपीएल’मधील काही प्रारंभिक सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्यात आले होते, तर गतवर्षी कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण तेरावे पर्व आखातातच यशस्वी करण्यात आले होते. ‘आयपीएल’चा आखातातील हा तिसरा थरार होय.
‘विवो आयपीएल २०२१’च्या चौदाव्या पर्वातील पहिल्या टप्प्यात भारतात ३१ सामने खेळविण्यात आलेले असून प्ले-ऑङ्गसह शेष २९ सामने दुबई, अबुधाबी आणि शारजा येथील अद्ययावत स्टेडियम्सवर होतील. ‘आयपीएल’ हा झटपट क्रिकेटचा रोमांचक थरार असून बेङ्गाट ङ्गटकेबाजीचा आविष्कार या इन्स्टंट क्रिकेटमध्ये घडतो. विशेष म्हणजे संयुक्त अरब अमिरातमधील स्टेडियम्स लहान असल्याने षट्‌कार-चौकारांची आतषबाजी क्रिकेटशौकिनांना तृप्त करील अशी अपेक्षा आहे.
‘विवो आयपीएल २०२१’च्या पहिल्या टप्प्यात भारतीय यष्टिरक्षक-ङ्गलंदाज ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील युवा दमाचा ‘दिल्ली कॅपिटल्स’ संघ आठ सामन्यांतील सहा विजयांसह अग्रस्थानी आहे, तर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील ‘चेन्नई सुपर किंग्ज’ आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या अधिपत्याखालील ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळूर’ सात सामन्यांअखेर प्रत्येकी पाच विजयांसह संयुक्त द्वितीय स्थानी आहेत. पाच वेळचा विजेता, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील ‘मुंबई इंडियन्स’ संघ सात सामन्यांतील ४ विजयांसह चौथ्या क्रमावर आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील ‘राजस्थान रॉयल्स’ ((७ सामन्यांत ३ विजय), के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ (८ सामन्यांत ३ विजय), इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील ‘कोलकाता नाइटरायडर्स’ (७ सामन्यांत २ विजय) आणि केंन विलियम्सच्या नेतृत्वाखालील ‘सनरायझर्स हैदराबाद’ (७ सामन्यांमध्ये १ विजय) असा पुढील क्रम असून संयुक्त अरब अमिरातमधील वेगळ्या हवामानात प्रत्येक संघ आपले कौशल्य पर्जळविण्यास उत्सुक असेल. युवा दमाचा ‘दिल्ली कॅपिटल्स’ आपली स्वगृहीची आगेकूच जारी राखण्यास तर ‘मुंबई इंडियन्स’ नेहमीप्रमाणे उशिराने तळपण्यास उत्सुक असेल. ‘चेन्नई सुपर किंग्ज’ तसेच पहिल्या आयपीएल जेतेपदाच्या प्रतीक्षेतील ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ संघ अष्टपैलू खेळाडूंनी परिपूर्ण असून ‘मुंबई इंडियन्स’ची बादशाहत रोखण्याचा प्रयत्न करील. इंग्लिश खेळाडूंच्या माघारीने काहीसा कमकुवत बनलेला ‘सनरायझर्स हैदराबाद’, ‘पंजाब किंग्ज इलेव्हन’ आणि ‘कोलकाता नाइटरायडर्स’ही आपल्या गुणवत्तेस साजेशा खेळीत आपला ठसा उमटविण्याचा प्रयत्न करतील. आठही संघ नैपुण्यकुशल देशी-विदेशी खेळाडूंनी परिपूर्ण असून चौकार-षट्‌कारांची आतषबाजी; भेदक, विस्मयकारी गोलंदाजी; चित्याच्या चपळाईने क्षेत्ररक्षण अशा नेत्रदीपक क्रिकेटचा विस्मयकारी नजराणा प्रेक्षकांसमोर सादर होईल अशी अपेक्षा बाळगणे अनाठायी ठरू नये.

टी-२० हा इन्स्टंट क्रिकेट प्रकार म्हणजे जणू एक झंझावात असतो. अखेरच्या क्षणापर्यंत किंबहुना ‘सुपर ओव्हर’पर्यंतही सामने रंगत असल्याने हा थरार आगळाच असतो. या थरारात एकेरी-दुहेरी नव्हे तर चौकार-षट्‌कारांची बरसात पाहायला मिळते आणि संयुक्त अरब अमिरातमधील मैदाने काहीशी लहान असल्याने उत्तुंग षट्‌कारांची बरसात याही वेळी अनुभवायला मिळेल अशी अपेक्षा आहे. आठही संघांत दर्जेदार ङ्गटकेबाज असून ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक षट्‌कार (३५७) ठोकलेला कॅरेबियन स्टार ख्रिस गेल (आरसीबी), ए. बी. डिविलियर्स (२४५-आरसीबी), रोहित शर्मा (२२४-एमआय), महेंद्रसिंह धोनी (२१७-सीएसके), कायरन पोलार्ड (२११-एमआय), विराट कोहली (२०५-आरसीबी), सुरेश रैना (२०२-सीएसके), डेविड वॉर्नर (२०१-सीएच) या षट्‌कार सम्राटांसह अन्य युवा दमाचे ङ्गलंदाजही बेदरकार ङ्गटकेबाजीत माहीर आहेत आणि त्यामुळे ‘विवो आयपीएल’चे चौदाचे पर्वही रोमांचक ठरण्याची अपेक्षा बाळगणे अवास्तव ठरू नये. ‘विवो आयपीएल २०२१’नंतर लगेच १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या यजमानपदाखाली संयुक्त अरब अमिरात आणि ओमानमध्ये ‘आयसीसी टी-२० वर्ल्ड कप’चा थरार रंगणार असून ही प्रतियोगिता सर्व खेळाडूंना तयारीसाठीचा उत्तम मंच ठरेल. ‘कोरोना’ महामारी हे या प्रतियोगितेला लागलेले ग्रहणच आहे. तथापि, संयुक्त अरब अमिरातमध्ये होणारी ही प्रतियोगिता यशस्वीपणे पार पाडण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सज्ज असून सर्वांच्या प्रयत्नांना यश लाभो आणि तमाम क्रिकेटशौकिनांना विलक्षण, उत्कट, दिमाखदार, विस्मयकारी क्रिकेटचे दर्शन घडो हीच इच्छा!

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

प्रश्न खड्‌ड्यांचा

रस्त्यांना पडलेल्या खड्‌ड्यांवरून आणि नव्याने बांधकाम होत असलेल्या महामार्गांच्या दुर्दशेवरून विरोधकांनी काल राज्य विधानसभेत सरकारला घेरले. राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधी आम्हीही वेळोवेळी आवाज...

खराब महामार्गामुळे विधानसभेत गदारोळ

>> कंत्राटदाराला नोटीस पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती पत्रादेवी ते काणकोण या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावरून काल विधानसभेत विरोधकांनी गोंधळ...

भंडारी समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण नाही

>> पालयेकर यांचा विधानसभेत आरोप ओबीसीसाठी जे आरक्षण आहे त्या कोट्यातून भंडारी समाजाला जेवढे आरक्षण मिळायला हवे तेवढे ते...

नोकरभरतीसाठी कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची खंवटेंची मागणी

विविध सरकारी खात्यांत नव्याने नोकरभरती करण्यापूर्वी त्या त्या खात्यांत गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अगोदर सेवेत कायम केले जावे,...

भारतात कोरोनाचे ९९ कोटी लसीकरण

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती भारतात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने काल तब्बल ९९ कोटींचा टप्पा गाठला...

ALSO IN THIS SECTION

शिक्षण ः कोविड आणि उपाय

विलास रामनाथ सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. विद्यालय, कुजिरा) इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना एकावेळी एक वर्ग...

भटीण आई

गजानन यशवंत देसाई मला एक प्रश्‍न पडतो, सोवळ्या-ओवळ्यात गुरफटून गेलेल्या त्या काळात भटीण आई कसं काय सगळं सांभाळून...

परीक्षा? नव्हे, सत्त्वपरीक्षा!

अंजली आमोणकर आयुष्यातील प्रत्येक गोष्ट संपेल, परंतु परीक्षा काही संपणार नाहीत- असा माझा पूर्ण समज आहे. समज कशाला…...

सेकण्ड हॅण्ड वाहन घेताना

शशांक मो. गुळगुळे सध्या अर्थव्यवस्थेत कर्जाची मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे बँका तसेच नॉन बँकिंग फिनान्शियल कंपन्या यांच्याकडून...

ड्रग्जच्या नशेचे विस्तारणारे वेड

राजेंद्र पां. केरकर अंमलीपदार्थ नियंत्रण पथकाच्या क्रूझवरच्या रेव्ह पार्टीवर घातलेल्या छाप्यात प्रतिष्ठित मंडळी जेरबंद झाल्याने या प्रकरणाची वाच्यता...