आयआयटी संस्थेसाठी धारगळ येथे निश्चित केलेली जमीन योग्य नसल्याने यासंबंधीचा प्रस्ताव केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने फेटाळल्याने आयआयटीसाठी नवी जागा शोधणार असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. पार्सेकर यांनी काल आयआयटीच्या प्रश्नावर केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन तपशीलवार चर्चा केली.धारगळ येथील जागा फेटाळल्याने सध्या आयआयटीचा कारभार फर्मागुढी येथूनच हाताळण्याचे ठरविले आहे, असे पार्सेकर यांनी सांगितले.

