आयआयटीला विरोधचुकीचा : ढवळीकर

0
8

फर्मागुडी येथील नियोजित आयआयटी संकुलासाठी होणारा विरोध योग्य नाही. कटमगाळ दादा हे धार्मिक स्थळ पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे, असा दावा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी एका पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना काल केला. राज्य सरकारने आयआयटी प्रकल्पासाठी उपलब्ध केलेली जमीन गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विस्ताराच्या वेळी खूप पूर्वीच संपादित करण्यात आलेली आहे. कटमगाळ दादा या धार्मिक स्थळाची जागा पूर्ण सुरक्षित असून, या जागेला हात लावला जाणार नाही. आयआयटी प्रकल्पाच्या जागेबाबत काही जणांकडून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप ढवळीकर यांनी केला.