‘आम आदमी’ पक्षाचे दिल्लीत उद्घाटन

0
44

अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ‘आम आदमी’ पक्षाचे रीतसर उद्घाटन काल दिल्लीत जंतरमंतर येथे केले. देशातून भ्रष्टाचार सर्व पातळ्यांवरून हटवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भारतीय संविधान दिनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात केजरीवाल यांनी आंबेडकरांच्या स्मारकाला आदरांजली वाहिली.

आपल्या पक्षामध्ये घराणेशाही असणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. रविवारी आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर केजरीवाल यांची राष्ट्रीय निमंत्रक म्हणून तर प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांची पदाधिकारी म्हणून नेमणूक केली गेली आहे.